ऋषभ पंतला स्थान नाही (फोटो- ians)
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात पुनरागमनासाठी धडपडणाऱ्या पंतला या महत्त्वाच्या सिरिजमध्ये संधी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निवडकर्त्यांनी त्याच्या नावाचा विचार न केल्याने त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात स्थान न मिळाल्याने पंतच्या आगामी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि त्याला इराणी ट्रॉफीचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
भारतीय संघातून वगळले असले तरी, निवड समितीने पंतवर इराणी ट्रॉफीसाठी विश्वास दाखवला आहे. या स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. राष्ट्रीय संघात परतण्यासाठी पंतला या घरगुती स्पर्धेत आपली छाप पाडावी लागणार आहे. कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची ही त्याच्याकडे सुवर्णसंधी असणार आहे.
‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
सध्याचा काळ ऋषभ पंतच्या कारकिर्दीतील अत्यंत आव्हानात्मक टप्पा मानला जात आहे. खराब फॉर्म आणि दुखापतींनंतर संघात स्थान टिकवून ठेवणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत खचून न जाता इराणी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करून पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.
ऋषभ पंतने २०१८ मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर २०२४ मध्ये पंतने एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला संपूर्ण वर्षात केवळ एकच सामना खेळायला मिळाला. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान त्याला एका सामन्यात संधी देण्यात आली होती, पण या संधीचे सोने करण्यात तो अपयशी ठरला आणि केवळ ६ रन्स करून आउट झाला. या निराशाजनक कामगिरीनंतर त्याला पुन्हा एकदा संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.






