गौतम गंभीर (फोटो- सोशल मिडिया)
न्यूझीलंडविरुद्ध नुकतीच टी 20 सिरीज संपली आहे. भारताने सिरीज जिंकली आहे. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली मानसिक स्थिति आणि प्रशिक्षक म्हणून असलेली जबाबदारीबाबत सांगितले. मी दबाव आणि परिस्थिती हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहे, असे गौतम गंभीर याने स्पष्ट केले.
एका मुलाखतीमध्ये गौतम गंभीरने भाष्य केले आहे. यामध्ये त्याने आपली मानसिक स्थिति आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून असलेला दबाव याबाबत खुली चर्चा केली आहे. ‘प्रामाणिकपणे सांगू तर मी थकलोय. मात्र हे मी सांभाळण्यासाठी सक्षम आहे’, असे गंभीरने म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघ निवडीबाबत देखील भाष्य केले आहे. हे माझे काम आहे. मी आधीही स्पष्ट केले आहे की, माझे काम योग्य निर्णय घेणे आहे, लोकप्रिय निर्णय घेणे नाही, असे गंभीर म्हणाला. संघाच्या हितासाठी कडक पावले उचलणे ही प्रशिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे. “ड्रेसिंग रूममध्ये बसून असे निर्णय घेणे खूप सोपे असते, ज्यामुळे बाहेर बसलेले लोक खुश होतील. परंतु, ज्या खेळाडूंनी दीर्घकाळ चांगली कामगिरी केली आहे, त्यांना पाठिंबा देण्याचे असल्याचे गंभीरने म्हटले आहे.
गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याचा कार्यकाळ हा यश आणि आव्हानांचा राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि टी-२० विश्वचषक २०२६ सारख्या महत्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच त्याला काही निराशाजनक पराभवांचाही सामना करावा लागला आहे.
आज Gautam Gambhir ‘भाई’ का बर्थडे, सेलिब्रेशन तर होणारच; ‘GG’ वर शुभेच्छांचा वर्षाव..!
Ans: गौतम गंभीर माजी भारतीय क्रिकेटपटू असून भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
Ans: भारताने न्यूझीलंडविरुद्ध 3-2 अशी टी 20 सिरीज जिंकली आहे.






