
photo- social media
आचारसंहितेनुसार हा चेन्नई संघाचा या हंगामातील दुसरा स्लो ओव्हर रेट गुन्हा आहे. यापूर्वी, हंगामातील १८ व्या सामन्यात, संघ निर्धारित वेळेत २० ओव्हर टाकण्यात अपयशी ठरला होता. आचारसंहितेच्या नियम २.२२ नुसार, जो किमान ओव्हर रेटशी संबंधित आहे. सामन्यानंतर, बीसीसीआयच्या आयपीएल नियामक परिषदेने संघाविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची घोषणा केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. केवळ कर्णधारावरच नव्हे, तर प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेयर्ससह उर्वरित खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या २५ टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या संघाने निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण केली नाहीत. या हंगामातील संघाचा हा दुसरा स्लो ओव्हर रेट टाकण्याचा गुन्हा होता, त्यामुळे कर्णधाराला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संघातील ११ खेळाडू आणि इम्पॅक्ट प्लेयर्ससह उर्वरित खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या २५ टक्के, यापैकी जी रक्कम कमी असेल, तो दंड आकारला जाईल.’
२१ मे रोजी अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात गुजरातने पाच वेळच्या विजेत्या चेन्नईला ८९ धावांनी पराभूत केले. हा दोन्ही संघांमधील शेवटचा सामना होता. या सामन्यात, गुजरात टायटन्सने आपल्या पहिल्या तीन फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४ विकेट्स गमावून २२९ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार शुभमन गिलने ६४, तर सलामीवीर साई सुदर्शनने ८४ धावा केल्या. त्यानंतर जोस बटलरने २७ चेंडूंमध्ये ५७ धावा करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नईचा संघ १३.४ ओव्हरमध्ये १४० धावांवर सर्वबाद झाला. ८९ धावांच्या या लाजिरवाण्या पराभवामुळे ते आयपीएल २०२६ मधून बाहेर पडले.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने खेळलेल्या १४ सामन्यांपैकी संघाला केवळ सहा सामने जिंकता आले. १२ गुण आणि -०.३४५ च्या खराब नेट रन रेटमुळे सीएसके प्लेऑफसच्या रेसमधून बाद झाला आहे. गेल्या सलग तीन हंगामात चेन्नईला आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. चेन्नईने २०२३ मध्ये शेवटचे आयपीएल विजेतेपद एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले होते.
IPL 2026: याला म्हणतात थरार! जागा 1 अन् सामने 5; कोणाला मिळणार IPL 2026 च्या प्लेऑफचे तिकीट?