राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) सध्या चौथ्या स्थानासाठी सर्वात मजबूत दावेदार मानला जात आहे. राजस्थाने शेवटच्या सामना जिंकल्यास त्यांची प्लेऑफमध्ये जागा जवळपास निश्चित होईल. राजस्थान क्वालिफाय होताच इतर संघाचा पत्ता कट होईल.
पंजाब किंग्स (Punjab Kings) अजूनही शर्यतीत कायम आहेत. त्यांना उर्वरित सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ असा मानला जात आहे. हा सामना जिंकला तरी त्यांना राजस्थानविरुद्ध मुंबईच्या विजयाची आशा करावी लागेल.
केकेआरने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा अखेरचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. विजय मिळाल्यास KKR चे १५ गुण होतील, पण त्यानंतरही त्यांना इतर निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) प्लेऑफचा मार्ग अत्यंत कठीण दिसत आहे. त्यांना उर्वरित सामना जिंकूनही इतर संघांच्या पराभवाची आशा ठेवावी लागणार आहे. विशेषतः KKR विरुद्धचा सामना दिल्लीसाठी निर्णायक ठरणार आहे. जर दिल्लीने तो सामना गमावला, तर त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येऊ शकते.
चेन्नईसाठी (Chennai Super Kings ) परिस्थिती आणखी गुंतागुंतीची आहे. CSK ला आपला शेवटचा सामना जिंकावा लागेल आणि त्याचबरोबर इतर संघांच्या निकालांनीही त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. गुजरात विरुद्धचा सामना चेन्नईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लेऑफच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. २ गुणांसह त्यांना नेट रनरेट आणि इतर संघाचे निकालही महत्त्वाचे ठरणार आहेत.
प्लेऑफच्या या चुरशीच्या लढतीत नेट रनरेट निर्णायक भूमिका बजावू शकतो. अनेक संघ समान गुणांवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या फरकाने विजय मिळवण्यावर सर्व संघ भर देताना दिसत आहेत. IPL 2026 मधील उर्वरित सामने आता मिनी नॉकआउटप्रमाणेच खेळले जाणार आहेत. प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामना अंतिम लढतीसारखा असेल.
झेल सुटला अन् हार्दिकचा पारा चढला, BCCI ची मोठी कारवाई; MI Vs KKR सामन्यात नेमकं काय घडलं?






