फोटो सौजन्य - सोशल मीडिया
BCCI नवीन मार्गदर्शक तत्त्वे : टीम इंडियाने झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध मालिकेमध्ये घरच्या मैदानावर एकतर्फी मालिका गमवावी लागली होती. त्यानंतर भारताचा संघ ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी गेला होता. यामध्ये भारताच्या संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. भारताच्या संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी करून सामन्यांमध्ये विजय मिळवला होता पण, त्यानंतर एक सामन्यांमध्ये ड्रॉ करून तीन सामन्यात भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या संघाचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची सातत्याने खराब कामगिरी, त्याचबरोबर भारतीय खेळाडूंच्या फलंदाजीवर देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह सोडून एकही गोलंदाजाने हवी तशी कामगिरी न केल्यामुळे भारताच्या संघाच्या हातून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा विजय ऑस्ट्रेलियाने हिसकावून घेतला.
दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर मालिका गमावल्यानंतर, बीसीसीआय खेळाडूंसाठी कठोर झाले आहे, जिथे त्याने क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार आता एखादा दौरा किंवा स्पर्धा ४५ किंवा त्याहून अधिक दिवसांची असेल तर खेळाडूंच्या पत्नींना जास्तीत जास्त दोन आठवडे या दौऱ्यावर राहण्याची मुभा असणार आहे.
यामुळे प्रत्येक खेळाडूला संघ बसने प्रवास करावा लागणार असून आता त्यांना स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ‘दैनिक जागरण’च्या वृत्तानुसार, संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे व्यवस्थापकही टीम हॉटेलमध्ये राहणार नाहीत किंवा व्हीआयपी बॉक्समध्येही बसणार नाहीत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खेळाडूंना अतिरिक्त सामानासाठी स्वतः एअरलाइन्सला पैसे द्यावे लागतील.
🚨 NEW GUIDELINES FROM BCCI. 🚨
– Cricketers’ wives will not be able to stay for the entire tour.
– A cricketer’s family can stay for a maximum of 2 weeks during a 45 day tour.
– Every player needs to travel by team bus, separate travelling not allowed. (Abhishek Tripathi). pic.twitter.com/ysCyHRguCO— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 14, 2025
भारताचा संघ २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या T२० मालिकेसाठी तयारी करत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामान्यांची T२० मालिका रंगणार आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवकडे संघाची कमान असणार आहे, त्याचबरोबर उपकर्णधारपद हार्दिक पांड्याला न देता अक्षर पटेलला देण्यात आले आहे. T२० मालिका झाल्यानंतर भारताचा संघ एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. फेब्रुवारीमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी होणार आहे, हा सामना टीम इंडियाचा बांग्लादेशशी होणार आहे.