फोटो सौजन्य - सोशल मीडिया
जेम्स अँडरसन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन त्याच्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीला पुन्हा सुरुवात करणार आहे. त्याने लँकेशायरसोबत एक वर्षाचा करार केला असून यासोबत तो आता काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यानंतर अँडरसनने एकही सामना खेळलेला नाही. त्यानंतर ते इंग्लंडच्या बॅकरूम स्टाफमध्ये सल्लागार म्हणून रुजू झाला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयपीएलच्या मेगा लिलावात त्याने आपले नाव दिले होते, परंतु कोणत्याही संघाने त्याच्यात रस दाखवला नाही. यामुळेच या ४२ वर्षीय क्रिकेटपटूने इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) सोबतचा केंद्रीय करार संपल्यानंतर काउंटी चॅम्पियनशिप आणि T-२० ब्लास्टमध्ये खेळण्यासाठी लँकेशायरशी करार केला आहे.
Rohit Sharma : 10 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात! रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये करणार पुनरागमन
या कराराबद्दल लँकेशायरने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘क्लबशी चर्चा केल्यानंतर अँडरसन २०२५ च्या हंगामात खेळेल आणि त्याचा ECB केंद्रीय करार संपल्यानंतर त्याने करारावर स्वाक्षरी केली आहे.’ अँडरसन शेवटचा जून २०२४ मध्ये लँकेशायरकडून खेळला होता, जेव्हा त्याने साउथपोर्टवर नॉटिंगहॅमशायरविरुद्ध ३५ धावांत सात विकेट घेतल्या होत्या. यासह अँडरसन जवळपास वर्षभरानंतर प्रथमच टी-२० सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
His story continues… 🤩🐐
Lancashire Cricket is delighted to confirm that @jimmy9 has signed a one-year contract to continue his playing career.
Jimmy will be available for the 2025 @CountyChamp and @VitalityBlast!
— Lancashire Cricket Men (@lancscricket) January 13, 2025
या कराराबद्दल अँडरसनने सांगितले की, लँकेशायरसोबत करार केल्यानंतर तो खूप उत्साहित आहे आणि आता खेळण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. तो पुढे म्हणाला, ‘मी लहान असल्यापासून या क्लबने माझ्या आयुष्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे लाल आणि पांढऱ्या चेंडूच्या दोन्ही प्रकारात संघाला मदत करणे ही एक संधी आहे ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहत आहे. माझी फिटनेस पातळी चांगली ठेवण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे.
इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसन याचा जन्म ३० जुलै १९८२ रोजी बर्नली, लँकेशायर येथे झाला. वयाच्या ४१ वर्षे ३४८ दिवसांनी त्याने क्रिकेटला अलविदा केला. जेम्स अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात लंडनच्या लॉर्ड्सच्या मैदानावर झाली आणि खास गोष्ट म्हणजे त्याने क्रिकेटच्या मक्केत म्हणजेच लॉर्ड्सवर आपल्या करिअरलाही अलविदा केला. त्याच्या कारकिर्दीतील हा एक रंजक योगायोग होता. २२ मे २००३ रोजी अँडरसनने लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. अँडरसनने त्याने त्याच्या पदार्पण कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात पाच विकेट घेतल्या होत्या. यावेळीच त्याने जगाला दाखवून दिले होते कि तो क्रिकेट विश्वामध्ये खळबळ उडवणार आहे. २००३ मध्ये जेम्स अँडरसन यांची कारकीर्द सुरु झाली होती आणि मागील वर्ष २०२४ मध्ये लॉर्ड्सवर थांबली.