
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs New Zealand : भारताचा संघ नव वर्षाच्या सुरुवातीला विश्वचषकाआधी न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळताना दिसणार आहे. यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार तर पाच सामन्यांची टी20 मालिका देखील खेळवली जाणार आहे. विश्वचषकासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे पण एकदिवसीय संघ अजूनपर्यत जाहीर केलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून भारताचे प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
क्रिकबझच्या एका अहवालानुसार, या दोन प्रमुख खेळाडूंना आगामी २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. हे दोन्ही खेळाडू केवळ २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करतील. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेमध्ये अनेक खेळाडूंना भारतीय संघामधून वगळले जाणार आहे असे वृत समोर आले आहे.
खरं तर, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (India vs New Zealand ODI) खेळू शकणार नाहीत. तथापि, दोन्ही खेळाडू टी२० मालिकेत खेळतील. ही टी२० मालिका विश्वचषकापूर्वी भारताची शेवटची टी२० मालिका असेल आणि दोन्ही खेळाडू सामन्याची पूर्णपणे तयारी करण्यासाठी त्यात सहभागी होतील. मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हार्दिक पंड्याने एकही वनडे खेळलेला नाही, तर बुमराहने २०२३ च्या विश्वचषकानंतर एकही वनडे खेळलेला नाही.
काही वृतांच्या माहितीनुसार असा दावा केला जात आहे की, रिषभ पंत याला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेमधून वगळण्यात येणार आहे तर त्याच्या जागेवर इशान किशन याला संघामध्ये स्थान मिळणार आहे. रिषभ पंत याला टी20 संघामध्ये देखील जागा मिळाली नाही. त्याचबरोबर टी20 विश्वचषकाच्या संघामधून शुभमन गिल याला देखील बाहेर केले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे सचिव उन्मेष खानविलकर म्हणाले की, ते भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरशी त्याच्या उपलब्धतेबाबत बोलतील. अय्यर सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या आगामी सामन्यांमध्ये खेळू शकेल की नाही यावर चर्चा केली जाईल. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी एकदिवसीय सामन्यादरम्यान अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. २५ डिसेंबरपासून तो बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे फिटनेस मूल्यांकन घेत आहे.
अलिकडेच, अय्यरने हलके जिम प्रशिक्षण आणि नेट प्रॅक्टिस पुन्हा सुरू केले आहे. त्याने सीसीआय नेटमध्ये सुमारे ३०-३४ मिनिटे फलंदाजी केली. जर सीओईने मान्यता दिली तर, अय्यर ३ आणि ६ जानेवारी रोजी विजय हजारे ट्रॉफी सामन्यांमध्ये मुंबईकडून खेळू शकेल. जर अय्यर लवकरच तंदुरुस्त झाला तर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय संघात त्याचे पुनरागमन संघासाठी एक मोठा फायदा होईल आणि भारताला २०२७ च्या विश्वचषकासाठी तयारी करण्यास मदत होईल.
पहिला सामना: वडोदरा, ११ जानेवारी २०२६
दुसरा सामना: राजकोट, १४ जानेवारी २०२६
तिसरा सामना: इंदूर, १८ जानेवारी २०२६