Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाईटक्लब प्रकरणानंतर ECB ची कठोर भूमिका; बेन स्टोक्स-अ‍ॅटकिन्सन दुसऱ्या कसोटीतून बाहेर, जो रूटच्या हाती इंग्लंडची धुरा

England drops Stokes, Atkinson for second NZ Test after nightclub incident: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन यांना संघातून वगळण्यात आले आहे. या निर्णयानंतर अनुभवी फलंदाज जो रूटकडे दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 11, 2026 | 02:23 PM
नाईटक्लब प्रकरणानंतर ECB ची कठोर भूमिका; बेन स्टोक्स-अ‍ॅटकिन्सन दुसऱ्या कसोटीतून बाहेर, जो रूटच्या हाती इंग्लंडची धुरा
Follow Us
Follow Us:
  • ECB ची कठोर भूमिका
  • स्टोक्स-अॅटकिन्सन दुसऱ्या कसोटीतून बाहेर
  • जो रूटच्या हाती इंग्लंडची धुरा
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन यांना १७ जून रोजी ओव्हल येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या संघातून वगळण्यात आले आहे. नाईटक्लब वादाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) हा मोठा निर्णय घेतला आहे. अनुभवी फलंदाज जो रूटची दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा हंगामी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

FIFA World Cup 2026 : एक ट्रॉफी, 48 दावेदार! आजपासून रंगणार FIFA चा थरार; पहिला सामना कधी अन् कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर

नेमकं काय घडलं?

लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर इंग्लंड संघाने ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष केला आणि त्यानंतर ते लंडनमधील ‘व्हाईट हॉर्स’ पबमध्ये गेले, जिथे त्यांची भेट सॅरासेन्स रग्बी क्लबच्या खेळाडूंशी झाली. रात्री ११ वाजल्यानंतर, काही खेळाडू चेल्सीमधील ‘रेक्स रूम्स’ नाईटक्लबमध्ये गेले. मात्र त्यानंतर स्टोक्स आणि अॅटकिन्सन यांनी संघाने घालून दिलेल्या मध्यरात्रीच्या कर्फ्यूचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दोघेही लंडनमधील एका नाईटक्लबमध्ये उपस्थित होते, जिथे सुरक्षा कर्मचाऱ्याशी संबंधित वादग्रस्त घटना घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंड संघाच्या संचारबंदीच्या वेळेनंतर एका तासाने, पहाटे १ वाजण्याच्या सुमारास तिथे हाणामारी झाली. या घटनेत स्टोक्स, वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन, ईसीबी सुरक्षा पथकाचा एक सदस्य आणि सॅरासेन्स अकादमीचा खेळाडू टोटोआ औवा यांची नावे समोर आली आहेत. यानंतर, दोघांनाही न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगलण्यात आले आहे.

जो रूटकडे नेतृत्व

मीडिया वुत्तानुसार, वादाच्या पार्श्वभूमीवर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) दुसऱ्या कसोटीसाठी संघाचे कर्णधारपद जो रूटकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.रूटने यापूर्वी २०१७ ते २०२२ दरम्यान ६४ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले होते आणि आता तो पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारेल. २०२२ नंतर प्रथमच रूट कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बेन स्टोक्स सध्या चौकशीला सामोरे जात आहे.

संघात कोणाला संधी?

स्टोक्स आणि अॅटकिन्सन यांच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फलंदाज जोर्डन कॉक्स यांना संघात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या आर्चरसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

इंग्लंडसमोर नवे आव्हान

पहिली कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या इंग्लंडसमोर आता नेतृत्व आणि संघरचनेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्टोक्ससारखा अनुभवी अष्टपैलू खेळाडू नसताना न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी जिंकणे सोपे नसेल. दुसरीकडे, या प्रकरणामुळे इंग्लंड संघाच्या शिस्तीवर आणि संघसंस्कृतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ:

जो रूट (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, जेम्स रियू, ऑली रॉबिन्सन, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक) आणि जोश टंग.

IND Vs AFG ODI Series: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! ‘हा’ जबरदस्त खेळाडू गेला संघाबाहेर, विषय काय?

Web Title: Ben stokes gus atkinson dropped nightclub controversy joe root england captain second test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • ben stokes
  • ENG vs NZ
  • England cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.