Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PSL 2025 : पाकिस्तान सुपर लीगला मोठा झटका! Pahalgam Terror Attack नंतर भारतातील प्रसारणावर बंदी.. 

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध ताणले गेले आहेत. याचा फटका आता पाकिस्तान क्रिकेटला देखील बसला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 26, 2025 | 08:59 AM
PSL 2025: Big blow to Pakistan Super League! Broadcast banned in India after Pahalgam Terror Attack..

PSL 2025: Big blow to Pakistan Super League! Broadcast banned in India after Pahalgam Terror Attack..

Follow Us
Close
Follow Us:

PSL 2025 : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानच्या काही डिजिटल आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२५ च्या भारतातील प्रसारणावर बंदी घालण्याचा समावेश आहे. जो पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सावजनिक भावनांचा विचार करून लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा : IPL 2025 :’२० वर्षे IPL खेळण्याचे लक्ष्य ठेव, कोहलीला बघ..!’ माजी क्रिकेटपटूचा १४ वर्षीय Vaibhav Suryavanshi ला सल्ला..

पाकिस्तान सुपर लीग ही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेचे भारतातील लाइव्ह प्रसारण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगवर सरकारने बंदी घातली आहे. यामागचे कारण म्हणजे भारत-पाकिस्तानमधील वाढता राजनैतिक तणाव आणि दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानशी संबंधित सांस्कृतिक आणि क्रीडा प्रसारण रोखणे. भारताचा पीसीबीला दणका आता बंदी घातल्यामुळे पीसीबीला आंतरराष्ट्रीय प्रसारणातून मिळणारा नफा कमी होऊ शकतो, कारण भारत ही क्रिकेटसाठी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जातो. त्यामुळे आता त्यांना पीएसएलच्या प्रसारणातून मिळणारा महसूल, विशेषतः भारतीय बाजारपेठेतून, कमी होईल. फॅनकोड आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सना याचा फटका बसू शकतो. तसेच पीएसएल आणि संबंधित प्रसारण कंपन्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते.

हेही वाचा : SRH vs CSK : CSK विरुद्ध Mohammad Shami ची विक्रमाला गवसणी, असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

चेन्नई सुपर किंगची पराभवाची मालिका सुरूच, हैद्राबादकडून दारुण पराभव..

काल (२४ एप्रिल) आयपीएलचा ४३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैद्राबादने चेन्नईला पराभवाची धूळ चारली. हैद्राबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रतिउत्तरात  हैदराबादने १९ व्या षटकात 154 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव केला. हैदराबादच्या विजयात  इशान किशन आणि अनिकेत वर्मा यांनी महत्वाची भूमिका वठवली आहे. आयपीएल २०२५ मधील ९ सामन्यात चेन्नईला ७ सामन्यात  पराभव तर केवळ २ सामन्यात विजय प्राप्त करता आला आहे. या पराभवाने चेन्नई गुणतालिकेत अगदी तळाला पोहचली आहे.   तर हैद्राबादला ९ सामन्यात केवळ तीनच विजय मिळाले आहेत.

 

Web Title: Big blow to psl 2025 broadcast banned in india after pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Pahalgam Terrorist Attack
  • pakistan
  • PSL 2025

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
4

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.