Birthday Special: Two stars born on July 18; One is ruling the field while the other is waiting for a comeback; Read in detail
Birthday Special : आज १८ जुलै रोजी भारतीय संघातील दोन स्टार खेळाडूंचा वाढदिवस साजरा करत आहे. तर आज भारतीय पुरुष संघातील इशान किशन आणि महिला संघातील स्टार फलंदाज स्मृती मानधना यांचा वाढदिवस आहे. इशान किशनने एकेकाळी आपल्या कामगिरीने भारतीय संघात प्रवेश केला होता. परंतु, २०२४ च्या सुरुवातीपासूनच त्यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्याच वेळी, स्मृती मानधना आता भारतीय महिला संघाची कर्णधार होण्याच्या दिशेने मार्गक्रमन करत आहे. आज या दोन्ही स्टार खेळाडूंचा वाढदिवस आहे. या निमित्ताने, आपण या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
स्मृती मानधनाबद्दल सांगायचे झालयास, ती भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक आहे. ती तिच्या डाव्या हाताने आक्रमक फलंदाजी करताना मैदानात दिसून येते. तसेच ती संघासाठी सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात करते. मानधनाबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे तिने तिन्ही स्वरूपात शतक झळकवून ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
१८ जुलै १९९६ रोजी मुंबईत जन्मलेल्या मंधानाने ५ एप्रिल २०१३ रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळायला सुरवात केली. तिने ७ कसोटी, १०३ एकदिवसीय आणि १४९ टी-२० सामने खेळले आहेत. तिने कसोटीत २ शतकांसह ६२९ धावा, एकदिवसीय सामन्यात ११ शतकांसह ४,५०१ धावा आणि टी-२० मध्ये १ शतक आणि ३१ अर्धशतकांसह ३,९८२ धावा फाटकावल्या आहेत.
मंधाना महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाची कर्णधार देखील आहे आणि तिने संघाला जेतेपदापर्यंत पोहचवले आहे. हरमनप्रीत कौरनंतर, ती भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत तिचे नाव आघाडीवर आहे. हरमनच्या अनुपस्थितीत ती टीम इंडियाचे यशस्वीरित्या नेतृत्व करताना ती दिसून येते.
इशान किशनबद्दल सांगायचं झालं तर इशानचा जन्म १८ जुलै १९९८ रोजी बिहारमधील पाटणा येथे झाला आहे. इशानने एकेकाळी अल्पकाळात देशातील सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आपली खास छाप पाडली होती. तो भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला असून तो आशिया कप २०२३ आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाचा भाग राहिला आहे. त्यावेळी असे बोलेल जात होते कि, किशनने बराच काळ भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. परंतु, २०२४ च्या सुरुवातीला, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला टी-२० मध्ये संधी नाकारण्यात आली. कसोटी मालिकेपूर्वी, त्याने संघातून ब्रेक मागितला होता. बीसीसीआयने ते अनुशासनहीन मानले आणि त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
यानंतर, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करून देखील त्याला संघात पुनरागमन करता आले नाही. २०२५-२६ मध्ये देशांतर्गत हंगामात चांगली कामगिरी करून तो पुन्हा टीम इंडियामध्ये परतण्याचा विचारात आहे. इशान किशन हा एक प्रतिभावान फलंदाज असून तो तिन्ही फॉरमॅटमध्ये कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्याची त्याची क्षमता ठेवतो.
विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम किशनच्या नावावर जमा आहे. २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने १२६ चेंडूत द्विशतक झळकावून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याने १३१ चेंडूत २१० धावांची खेळी केली होती. भारतासाठी, किशनने २ कसोटी सामन्यात १ अर्धशतकासह ७८ धावा, २७ एकदिवसीय सामन्यात १ शतकासह ९३३ धावा आणि ३२ टी-२० सामन्यात ६ अर्धशतकांसह ७९६ धावा केल्या आहेत.