
Pune Football Competition
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खडकी ब्ल्युज् संघाने मस्का एफसीचा ५-० असा धुव्वा उडवला. खडकी ब्ल्युज्कडून गोकुळ कोळी आणि श्लोक मोरे यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले, तर वॉल्टर सोलोमन याने एक गोल करत संघाचा विजय सुकर केला. दुसऱ्या एका लढतीत नॉईज बॉईज एफसीने स्निग्मय एफसीचा ४-१ असा सहज पराभव केला. नॉईज बॉईजकडून निरंजन खुडे याने दोन गोल केले, तर अक्षय दगडे आणि आदित्य गंगे यांनी प्रत्येकी एकेक गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. स्निग्मय एफसीकडून आदिक विनोज याने एकमेव गोल नोंदवला.
Viral Video: तब्बल 53 वेळा रेड कार्ड अन् जोरदार मारामारी अन्…; BRAZIL मधला Video पाहून म्हणाल…
अन्य दोन चुरशीच्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये जीओजी ब संघाने फाल्कन्स् एफसी ब संघावर १-० अशी निसटती मात केली. आदित्य पाटील याने केलेला एकमेव गोल जीओजीच्या विजयासाठी निर्णायक ठरला. चौथ्या सामन्यात स्पोर्टीको एफसीने उत्कर्ष क्रीडा मंच संघाचा २-१ असा पराभव करून अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले. स्पोर्टीकोकडून अनिकेत देवी आणि सिद्धांत नंदे यांनी प्रत्येकी एक गोल केला, तर उत्कर्ष क्रीडा मंचकडून स्वराज पाटील याने एक गोल नोंदवून पराभवाचे अंतर कमी केले.
पहिला सामना: नॉईज बॉईज एफसी: ४ (अक्षय दगडे ९ वे मिनिट; आदित्य गंगे २३ वे मिनिट [पास- निरंजन खुडे]; निरंजन खुडे ३९ वे, ४५ वे मिनिट [पास- ऋषीकेश खांडवे]) वि.वि. स्निग्मय एफसी: १ (आदिक विनोज ३५ वे मिनिट).
दुसरा सामना:खडकी ब्ल्युज्: ५ (गोकुळ कोळी ९ वे, २४ वे मिनिट; श्लोक मोरे ३१ वे, ३५ वे मिनिट; वॉल्टर सोलोमन ४३ वे मिनिट) वि.वि. मस्का एफसी: ०.
मैदानावरच मृत्यूने गाठलं! गोलकीपरसोबत भीषण टक्कर अन् Jesús de Miguel…; क्रीडविश्व हादरलं
तिसरा सामना:जीओजी ब: १ (आदित्य पाटील ३५ वे मिनिट [पास- अंकुर राय]) वि.वि. फाल्कन्स् एफसी ब: ०.
चौथा सामना:स्पोर्टीको एफसी: २ (अनिकेत देवी १४ वे मिनिट; सिद्धांत नंदे २५ वे मिनिट) वि.वि. उत्कर्ष क्रीडा मंच: १ (स्वराज पाटील ४५ वे मिनिट).
Ans: नॉईज बॉईज एफसी, खडकी ब्ल्युज्, जीओजी ब आणि स्पोर्टीको एफसी या चार संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Ans: खडकी ब्ल्युज् संघाने 5-0 आणि नॉईज बॉईज एफसीने 4-1 असा दणदणीत विजय मिळवला.