
Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली - घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सोनाली कुमारीने आपल्या नेत्रदीपक खेळाने सर्वांची मने जिंकली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत सोनालीने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणला ९-२५, २५-१७ व १९-१७ असे चीत करत या गटाचे विजेतेपद पटकावत रुपये 10000 व सारस्वत चषक काबीज केला. या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या अंजली सिरीपुरमने मुंबईच्या मिताली पाठकवर तीन सेटमध्ये २१-२४, २४-१४ व २५-१० अशी मात केली.
विजेत्यांना सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष किशोर रांगणेकर यांच्या हस्ते रोख पारितोषिके, सारस्वत चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, सारस्वत ब्राम्हण समाजाचे मुख्य सचिव राजेंद्र देसाई, उपाध्यक्ष सुभाष कामत व कार्यकारिणी सदस्य रवींद्रनाथ भांगले आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य सचिव राजेंद्र देसाई यांनी स्पर्धेच्या नीटनेटक्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत प्रतिवर्षी स्पर्धेचे आयोजन करण्याची ईच्छा व्यक्त केली.
दरम्यान, त्याआधी उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रशांत मोरेने निलांश चिपळूणकरचा २१-८, ६-२५, २५-१० असा व महम्मद घुफ्रानने अभिजित त्रिपनकरचा २५-१७, २४-१७ असा पराभव केला, तर महिलांमध्ये केशर निर्गुणने मिताली पाठकचा असा २-१८, २५-१४, २५-४, तर सोनाली कुमारीने अंजली सिरीपुरमचा २५-११, २५-१३ असा पराभव करत आगेकूच केली होती.
Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा