Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
सारस्वत ब्राम्हण समाज, मुंबई यांच्यावतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने शांती निवास वातानुकूलित हॉल, चर्नी रोड ( पूर्व ), मुंबई येथे सुरु असलेल्या पहिल्या सारस्वत ब्राम्हण समाज राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत (Carrom Tournament) महिला एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या सोनाली कुमारीने मुंबईच्याच अंबिका हरिथवर सरळ दोन सेटमध्ये १८-१७ व २०-१२ अशी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या सोनालीने अंबिका हरिथला सरळ दोन सेटमध्ये हरवल्याचा स्पष्ट व्हिडीओ पुरावा असतानाही रिझर्व्ह बँकेची अंबिका जिंकल्याचा निर्णय दिला होता. यामुळे सोनालीचे विश्व अजिंक्यपद स्पर्धा खेळण्याची संधी हुकली आणि तिचे फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या सामन्यावर कॅरम रसिकांची विशेष नजर होती. या चुकीच्या निर्णयाची सोनालीने परतफेड केली.
Lovlina Borgohain : पहिल्याच संधीत पात्र ठरण्याचे लक्ष्य; ऑलिम्पिकवर लवलिनाच्या नजरा
पुरुष एकेरी गटाच्या रंगतदार उप उपांत्य फेरीत पुण्याच्या अभिजित त्रिपनकरने मुंबईच्या अनुभवी संजय मांडेला २५-१०, १७-२२ व २०-१६ असे तीन सेटमध्ये हरवले. इतर सामन्यात निलांश चिपळूणकरने मुनियप्पन राजाचा २५-६, २२-२५, २५-३ असा, प्रशांत मोरेने रिझवान शेखचा २२-२०, २४-०४ असा, तर महम्मद घुफ्रानने योगेश परदेशीचा २३-१०, २५-२१ असा पराभव केला.
तसेच महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अंजली सिरीपुरमने नीलम घोडकेचा २५-१, २५-९ असा, केशर निर्गुणने रिंकी कुमारीचा २३-७, २५-८ असा आणि मिताली पाठकने उर्मिला शेंडगेचा २५-११, २१-१० असा पराभव करत आगेकूच केली. आता स्पर्धा रंगतदार वळणावर आली असून आगामी काळात अखेरच्या सामन्यांचा थरार पाहण्यास मिळणार आहे.






