Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Carrom Tournament : राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारीने अंबिका हरिथवर विजय मिळवत मागील सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. या स्पर्धेत पुरुषांच्या सामन्यात अग्रमानांकीत अभिजीत त्रिपनकरने आगेकूच केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 04, 2026 | 09:04 PM
Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Follow Us
Follow Us:
  • सोनालीने मागील पराभवाचा वचपा काढला
  • अग्रमानांकीत अभिजीतचीही आगेकूच
  • निलांशसह प्रशांत मोरेही पुढील फेरीत
 

सारस्वत ब्राम्हण समाज, मुंबई यांच्यावतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने शांती निवास वातानुकूलित हॉल, चर्नी रोड ( पूर्व ), मुंबई येथे सुरु असलेल्या पहिल्या सारस्वत ब्राम्हण समाज राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत (Carrom Tournament) महिला एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या सोनाली कुमारीने मुंबईच्याच अंबिका हरिथवर सरळ दोन सेटमध्ये १८-१७ व २०-१२ अशी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सोनालीचे दमदार कमबॅक

नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या सोनालीने अंबिका हरिथला सरळ दोन सेटमध्ये हरवल्याचा स्पष्ट व्हिडीओ पुरावा असतानाही रिझर्व्ह बँकेची अंबिका जिंकल्याचा निर्णय दिला होता. यामुळे सोनालीचे विश्व अजिंक्यपद स्पर्धा खेळण्याची संधी हुकली आणि तिचे फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या सामन्यावर कॅरम रसिकांची विशेष नजर होती. या चुकीच्या निर्णयाची सोनालीने परतफेड केली.

Lovlina Borgohain : पहिल्याच संधीत पात्र ठरण्याचे लक्ष्य; ऑलिम्पिकवर लवलिनाच्या नजरा

अग्रमानांकीत अभिजीत त्रिपनकरची आगेकूच

पुरुष एकेरी गटाच्या रंगतदार उप उपांत्य फेरीत पुण्याच्या अभिजित त्रिपनकरने मुंबईच्या अनुभवी संजय मांडेला २५-१०, १७-२२ व २०-१६ असे तीन सेटमध्ये हरवले. इतर सामन्यात निलांश चिपळूणकरने मुनियप्पन राजाचा २५-६, २२-२५, २५-३ असा, प्रशांत मोरेने रिझवान शेखचा २२-२०, २४-०४ असा, तर महम्मद घुफ्रानने योगेश परदेशीचा २३-१०, २५-२१ असा पराभव केला.

तसेच महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अंजली सिरीपुरमने नीलम घोडकेचा २५-१, २५-९ असा, केशर निर्गुणने रिंकी कुमारीचा २३-७, २५-८ असा आणि मिताली पाठकने उर्मिला शेंडगेचा २५-११, २१-१० असा पराभव करत आगेकूच केली. आता स्पर्धा रंगतदार वळणावर आली असून आगामी काळात अखेरच्या सामन्यांचा थरार पाहण्यास मिळणार आहे.

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये रंगणार स्पर्धा

Web Title: Carrom tournament sonali kumari beat ambika harith rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sports
  • tournament

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
1

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
2

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती
3

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप
4

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.