फोटो सौजन्य - ICC सोशल मिडीया
भारत आणि न्यूझीलंड हेड टू हेड आकडेवारी : भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. हे दोन्ही संघ चॅम्पियन ट्रॅाफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. भारताच्या संघाने बांग्लादेश आणि पाकिस्तान या संघांना पराभूत करून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पण अजुनही भारताच्या संघाचा स्पर्धेचा शेवटचा साखळी सामना शिल्लक आहे. भारताचा संघ आज 2 मार्च रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी करत आहे. तर मिचेल सेंटनरचा संघ सुध्दा स्पर्धेमध्ये अपराजित आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आयोजित करण्यात आलेला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सेमीफायनलमध्ये ग्रुप अ मधील भारत, न्यूझीलंड हे संघ आहेत तर ग्रुप ब मधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीमध्ये खेळणार आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील आकडेवारीवर नजर टाकली तर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध ११८ सामने खेळले आहेत. यामध्ये भारताचा वरचष्मा आहे. भारताने ६० वेळा तर न्यूझीलंडने ५० वेळा विजय मिळवला आहे. आजचा सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. याआधी जेव्हा दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी दुबईमध्ये खेळले आहेत, यामध्ये न्यूझीलंडचे थोडेसे वर्चस्व राहिले आहे. न्यूझीलंडने १६ वेळा आणि टीम इंडियाने १५ वेळा विजय मिळवला आहे.
मागील 10 सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ 10 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 5 वेळा ने भारताने न्यूझीलंडला पराभूत केले आहे, तर भारताला न्यूझीलंडने 3 वेळा हरवले आहे. या लढतीत 2 सामने अनिर्णीत राहिले आहेत. भारताच्या संघाने घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकले आहेत.
भारताच्या संघामध्ये रिषभ पंतला संधी मिळू शकते, तर गोलंदाजांमध्ये अर्शदीपला संघामध्ये दिले जाऊ शकते. ओपनिंग करताना शुभमन गिल आणि रोहित शर्मा दिसतील, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, पाचव्या क्रमांकावर केएल राहुलला संधी मिळु शकते.
भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. गिलने २ सामन्यात १४७ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने सुद्धा संघासाठी कमालीची कामगिरी करुन दाखवली आहे.