फोटो सौजन्य - Jiohotstar सोशल मीडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड लाइव्ह स्कोअर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील सामना सुरु झाला आहे. या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा ११ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा बाहेर आहे. तो आजारी आहे त्याचबरोबर टोनी डिझोर्झी देखील बाहेर आहे. त्यांच्या जागी हेनरिक क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्स यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड संघात मार्क वूडची जागा साकिब महमूदने घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! Champions Trophy 2025 च्या सेमीफायनलमध्ये हा ओपनर होऊ शकतो बाहेर
या सामन्यापूर्वी, जोस बटलरने इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत, कर्णधार म्हणून हा त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना असेल. त्याच वेळी, जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला, तर ते गट ब मध्ये अव्वल स्थानावर पोहोचेल, तर इंग्लंड प्रतिष्ठेसाठी खेळेल. भारत आणि न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या गट अ मधून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, परंतु गट ब मधून फक्त ऑस्ट्रेलियाने अंतिम ४ मध्ये स्थान मिळवले आहे. जर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला तर ते पुढील फेरीत प्रवेश करेल. तथापि, जर संघ मोठ्या फरकाने हरला तर अफगाणिस्तानलाही संधी मिळू शकते.
Aiden Markram to lead the Proteas in their bid for a semi-final spot as they bowl first in Karachi 🏏#ChampionsTrophy #SAvENG ✍️: https://t.co/hLHFkxBFg5 pic.twitter.com/fBTUfxuOce
— ICC (@ICC) March 1, 2025
इंग्लंडचा संघ आधीच सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर झाला आहे. आजचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी महत्वाचा आहे. आज चॅम्पियन ट्रॉफीचा सामना दक्षिण आफ्रिकेला जिंकणे अनिवार्य आहे. आजच्या सामन्यांमध्ये जर दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यास संघाला कमी रन रेटने सामन्यात पराभव झाल्यास सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे.
फिल साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकिपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद
ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, वियान मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.