Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs ENG Match : ‘बेन डकेट’ने रचला इतिहास; ऑस्ट्रेलियाची धुलाई करीत 165 धावांची खेळी; कांगारूंसमोर 352 धावांचे विशाल लक्ष्य

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, इंग्लडने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत एकटा बेन डकेटने कांगारूंची गोलंदाजी धुवून काढली अन् ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 22, 2025 | 07:01 PM
'बेन डकेट'ने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची केली धुलाई; 165 धावांची खेळी करीत रचला इतिहास; कांगारूंसमोर 352 धावांचे विशाल लक्ष्य

'बेन डकेट'ने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची केली धुलाई; 165 धावांची खेळी करीत रचला इतिहास; कांगारूंसमोर 352 धावांचे विशाल लक्ष्य

Follow Us
Close
Follow Us:

Champions Trophy 2025  AUS vs ENG Match :  ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लडचा सलामीवर बेन डकेट आज ऑस्ट्रेलियाला आस्मान दाखवले. फिल सॉल्टची विकेट लवकर गेल्यानंतर त्याने एकहाती किल्ला लढवला. त्याला जो रूटने चांगली साथ दिली. बेन डकेटने 143 चेंडूत 165 धावांची मोठी खेळी केली. तर जो रुटने 78 चेंडूत 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणताही फलंदाज प्रभाव दाखवू शकला नाही. शेवटच्या फळीत जोफ्रा आर्चरने जोरदार फटकेबाजी करीत 10 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.

बेन डकेटने रचला इतिहास

Curriculum vitae 📝 Name: Ben Duckett
Occupation: England Cricketer
Enjoys: Smashing runs vs Australia pic.twitter.com/fpaiqWFGQp
— England Cricket (@englandcricket) February 22, 2025

 

इंग्लंडच्या बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने कांगारूंना चकित केले. इंग्लंडने ६ षटकांत २ गडी गमावले असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेन डकेटने शानदार शतक झळकावले. डकेटने केवळ शतकच केले नाही तर त्याच्या आक्रमक फलंदाजीने ऑस्ट्रेलियालाही मागे टाकले. त्याने ९५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे शतक आहे.

लाहोरमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथचा निर्णय सुरुवातीला योग्य वाटला. ऑस्ट्रेलियाने ४३ धावांच्या आत इंग्लंडचे २ बळी घेतले. फिल सॉल्ट १० धावा काढून बाद झाला आणि जेमी स्मिथ १५ धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्या सुरुवातीच्या यशाचा अभिमान वाटत होता पण बेन डकेटने जो रूटसह कांगारूंच्या आनंदावर विरजण घातले.

बेन डकेट आणि जो रूट यांनी फक्त २५.४ षटकांत १५८ धावा जोडून इंग्लिश संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. रूट ६८ धावा करून बाद झाला, पण बेन डकेटने शतक पूर्ण करण्यापूर्वी हार मानली नाही. रूट बाद झाल्यानंतर लगेचच पुढच्याच षटकात त्याने सलग दोन चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. त्याने १०० धावांचा टप्पा गाठताना एक षटकार आणि ११ चौकार मारले.

Web Title: Champions trophy 2025 aus vs eng match ben duckett sweeps australian bowlers creates history by scoring 165 runs huge target of 352 runs for australian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • Australia
  • Ben Duckett
  • Champions Trophy 2025
  • England
  • Gaddafi Stadium
  • Harry Brook
  • Joe Root
  • jofra archer

संबंधित बातम्या

Sydney Fireworks: सिडनीचा शांतता संदेश; Bondi हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आकाशात होणार जगातील सर्वात मोठी आतिषबाजी
1

Sydney Fireworks: सिडनीचा शांतता संदेश; Bondi हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आकाशात होणार जगातील सर्वात मोठी आतिषबाजी

Damien Martyn Hospitalized: ऑस्ट्रेलियाचा ‘विश्वचषकातील हिरो’ कोमात, मृत्यूशी देतोय झुंज; चाहते या दिग्गजासाठी करतात प्रार्थना
2

Damien Martyn Hospitalized: ऑस्ट्रेलियाचा ‘विश्वचषकातील हिरो’ कोमात, मृत्यूशी देतोय झुंज; चाहते या दिग्गजासाठी करतात प्रार्थना

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर,  या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व
3

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व

 AUS vs ENG : हॅरी ब्रूकचा कसोटी क्रिकेटमध्ये भीम पराक्रम! सर्वात जलद ३००० धावा करत रचला खास इतिहास 
4

 AUS vs ENG : हॅरी ब्रूकचा कसोटी क्रिकेटमध्ये भीम पराक्रम! सर्वात जलद ३००० धावा करत रचला खास इतिहास 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.