लाहोरच्या मैदानावर इब्राहिम झारदानचा कहर, इंग्लडच्या गोलंदाजांची धुलाई
Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानच्या इब्राहिम जार्दानने आज लाहोरच्या मैदानावर मोठा कहर केला. यामध्ये इब्राहिम जार्दानने इंग्लडच्या गोलंदाजांची धुलाई करीत 135 चेंडूत 151 धावा केल्या. सलामीवीर गुरबाज आणि इब्राहिम यांनी डावाची सुरुवात केली. परंतु, गुरबाज लवकर बाद झाला परंतु त्यानंतर इब्राहिम जार्दानने धमाकेदार खेळी करीत अफगाणिस्तानला 300 धावापर्यंत नेले.
इब्राहिम झार्दानच्या दीड शतकी खेळी
𝟏𝟓𝟎 𝐒𝐭𝐫𝐨𝐧𝐠 𝐚𝐧𝐝 𝐂𝐨𝐮𝐧𝐭𝐢𝐧𝐠! 🤩@IZadran18 just keeps getting better and better as he makes his way to 150 against England. Marvelous!!! 👏#AfghanAtalan | #ChampionsTrophy | #AFGvENG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/0GICzlcyWv
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 26, 2025
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 325 धावा केल्या. यामध्ये सलामीला आलेल्या इब्राहिम झार्दानने शानदार खेळी करीत 146 चेंडूत 177 धावा केल्या. गुरबाज आज विशेष प्रभाव पाडू शकला नाही, त्याने सलामीला येऊन 6 धावा केल्या. त्यानंतर सेदिकुल्लाह अटलने 4 धावा केल्या. त्यानंतर रहमद शाह अवघ्या 4 धावा करून बाद झाला. हशमुतुल्लाह शाहिदीने 67 चेंडूत 40 धावा केल्या. अझमुत्तुलाह ओमराझाईने 31 चेंडूत 41 धावा केल्या. मोहम्मद नईबने 24 चेंडूत 40 धावा केल्या. आज अफगाणिस्तानकडून इब्राहिम झार्दानने इंग्लडसारख्या बलाढ्य संघाच्या गोलंदाजांची बेदम धुलाई केली. इब्राहिम झार्दानने वेगवान 177 धावा केल्या.
इंग्लडची गोलंदाजी
इंग्लडकडून जोफ्रा आर्चरने 10 षटकांमध्ये 3 विकेट घेत 64 धावा दिल्या. तर मार्क वूडने 8 ओव्हरमध्ये 50 धावा दिल्या. जेमी ओव्हरटनने 10 षटके टाकत 1 विकेट घेत 72 धावा केल्या. आदिल रशिदने 10 षटकांमध्ये 1 विकेट घेत 60 धावा दिल्या. लियम लिव्हिंगस्टोनने 5 षटकांमध्ये 2 विकेट घेत 28 धावा दिल्या.
अफगाणिस्तानच्या इंग्लडविरुद्ध 325 धावा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आठव्या सामन्यात, प्रथम खेळणाऱ्या अफगाणिस्तानने ३२५ धावा केल्या आहेत. आता, उपांत्य फेरीच्या शर्यतीत जिवंत राहण्यासाठी इंग्लंडला ३२६ धावा कराव्या लागतील. अफगाण संघाचा सर्वात मोठा हिरो इब्राहिम झद्रान होता, ज्याने १७७ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार हसमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनीही लहान डाव खेळून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय अजिबात चांगला ठरला नाही कारण अफगाण संघाने ३७ धावांवर ३ विकेट गमावल्या. त्यानंतर, इब्राहिम झद्रानने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीसह १०४ धावांची भागीदारी केली आणि आपल्या संघाला सामन्यात परत आणले. शाहिदीने ४० धावा केल्या. त्यानंतर, झद्रानने अझमतुल्लाह उमरझाईसोबत ७२ धावांची जलद भागीदारी केली आणि शेवटी मोहम्मद नबीसोबत १११ धावांची जलद भागीदारी केली.