
Champions Trophy 2025 : पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर रंगतोय पहिला सामना; पाहा प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट
Champions Trophy 2025 Pak vs NZ Live : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सलामीवीर जोडी विल यंग आणि डेव्होन कॉन्वे हे मैदानात उतरले आहेत. तब्बल 29 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. कराचीमध्ये खेळला जाणारा या सामन्यात न्यूझीलंडचे वजन मोठे आहे. नुकतेच न्यूझीलंडने पाकिस्तानला हरवून मालिका जिंकली होती.