Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून सन्मान; ३ कोटी रुपये रोख बक्षीस देऊन केला गौरव

फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ मध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखने विजय प्राप्त केला आहे. तिच्या या कामगिरीचा गौरव म्हणून राज्य सरकारकडून तिला ३ कोटी रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 02, 2025 | 09:47 PM
Chess World Cup winner Divya Deshmukh honored by state government; Honored with a cash prize of Rs 3 crore

Chess World Cup winner Divya Deshmukh honored by state government; Honored with a cash prize of Rs 3 crore

Follow Us
Close
Follow Us:

Divya Deshmukh becomes Women’s Chess World Champion: नुकताच फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ मध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखने विजय प्राप्त केला आहे. दिव्याने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत तिने भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत केले. या विजयाने दिव्या देशमुखनेने देशाची मान उंचावली आहे. या कामगिरीची दखल राज्य सरकारने घेतली आहे. भारताच्या ८८ व्या ग्रँडमास्टर असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखला महाराष्ट्र शासनाने विशेष सन्मान देऊन ३ कोटी रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करण्यात आला. नागपूरला हा सोहळा पार पडला.

हेही वाचा :  IND vs ENG 5th Test : शुभमन गिलची गाडी सुसाट! ओव्हल येथे रचला इतिहसा; मोडला ग्राहम गूचचा विक्रम

या वेळी दिव्याच्या सत्कार समारंभाला मुख्यमंत्री फडणवीस यांचेसह क्रीडा मंत्री मानिकराव कोकाटे, माजी आमदार अॅड. आशिष जयस्वाल, तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा सन्मान फक्त नागपूरचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाचा असा क्षण आहे. क्रिकेटप्रमाणेच बुद्धिबळसुद्धा व्यावसायिक स्वरूप घेत असून शासन याला पूर्ण सहकार्य करत आहे.” दिव्याने नुकत्याच झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आपल्याच देश बांधव असणाऱ्या अनुभवी ग्रँडमास्टर कोणेरू हम्पीला टायब्रेकमध्ये १.५-०.५ नी पराभूत करत, इतिहास रचला होता. त्यामुळे १९ व्या वर्षी विजय मिळवत ती सर्वात तरुण विश्वविजेती ठरली आहे आणि ग्रँडमास्टरपद देखील प्राप्त केलं.

या विजयानंतर दिव्या देशमुखला २०२६ च्या कॅन्डिडेट्स टुर्नामेंटमध्ये सहभागाचा आणि GM पदाचाही मान मिळाला आहे. या वेळी दिव्या म्हणाली की, “मी लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी ही कामगिरी केली याचा मला आनंद आहे”

दिव्या देशमुख हिच्या बुद्धिमत्ता आणि चिकाटीसाठी राज्य शासनाची कौतुकाची थाप! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे 2025च्या FIDE महिला विश्वचषकाची विजेती भारताची पहिली महिला ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख यांचा भव्य ‘नागरी सन्मान सोहळा’ संपन्न झाला. यावेळी… pic.twitter.com/CPK0gCvCLC — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2025

हेही वाचा : ‘कधीकधी अंतर तुम्हाला..’, फुलराणीचा चाहत्यांना सुखद धक्का; सायना नेहवाल आणि पती पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र

 

भारताने चीनची भिंत भेदून विजेतेपद मिळवले..

भारताच्या दोन्ही खेळाडूंनी चिनी भिंत तोडून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिडे विश्वचषक नॉकआउट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी, ३८ वर्षीय कोनेरू हम्पी आणि १९ वर्षीय दिव्या देशमुख यांनी या स्पर्धेत अनेक चिनी खेळाडूंवर मात केली. महिला गटात चीन टॉप १०० मध्ये अव्वल स्थानावर आहे. चीनच्या १४ खेळाडूंनंतर, भारतातील ९ खेळाडू टॉप १०० मध्ये येतात. परंतु फिडे विश्वचषकामध्ये कोनेरू आणि दिव्या यांनी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या चिनी खेळाडूंना पराभूत करत भारताचा दबदबा दाखवला.

 

Web Title: Chess world cup winner divya deshmukh honored by state government honored with a cash prize of rs 3 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 09:47 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Divya Deshmukh
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
1

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?

चाकणमधील वाहतूक कोंडीवर कधी तोडगा निघणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

चाकणमधील वाहतूक कोंडीवर कधी तोडगा निघणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा इशारा
4

शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.