Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या

अमली पदार्थांच्या तस्करीला आणि सेवनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सने (एएनटीएफ) अल्पावधीतच कात टाकत धडाकेबाज कामगिरी बजावण्यास सुरूवात केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 01:28 PM
'एएनटीएफ'चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या

'एएनटीएफ'चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका
  • काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड
  • 44 आरोपींना ठोकल्या बेड्या
पुणे/अक्षय फाटक : राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीला आणि सेवनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सने (एएनटीएफ) अल्पावधीतच कात टाकत धडाकेबाज कामगिरी बजावण्यास सुरूवात केली आहे. राज्यभरात पथकाने काही महिन्यांत तब्बल २१ गुन्हे उघडकीस आणले असून, ४४ आरोपींना अटक देखील केली आहे. या कारवाईत अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे टास्क फोर्स ड्रग्ज तस्करांसाठी ‘काळ’ बनणार आहे.

 

राज्यभरात अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सचे मुंबई वगळता कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती तसेच नांदेड विभाग करण्यात आले आहेत. पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) मुख्यालय आहे. येथून या विभागाचे कामकाज सुरू असून, सीआयडीचे अतिरीक्त पोलिस महासंचालक तसेच प्रमुख सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाचे कामकाज सुरू आहे. अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या प्रत्येक विभागाला एक डीवायएसपी तसेच दोन डीवायएसपीसाठी (उपविभागीय पोलिस अधिकारी) एसपी (पोलिस अधीक्षक) आहेत. कर्मचाऱ्यांच्या नेमणूका काही विभागात सुरूच आहेत. तर, कार्यालयीन कामकाज देखील नुकतेच सुरूवात झालेले असताना या पथकांनी कामगिरी सुरू केली आहे.

नेटवर्क मोडीत काढण्यासाठी पथकाची सुरूवात

राज्यात अमली पदार्थांची वाढती साखळी, तरुणांमध्ये वाढते व्यसन व आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेले याचे नेटवर्क मोडीत काढण्यासाठी या पथकाची सुरूवात करण्यात आली आहे. वेगवेगळ्या शहरातील पोलिस अंमलदार यांची नेमणूक करून कारवाई केली जात आहे. गुप्त माहिती तसेच तांत्रिक तपासावरून ड्रग्ज तस्कर, त्यांचे एंजट व मोठे सूत्रधार पकडले जात आहेत. पथकाकडून फक्त एंजट नाही तर त्याची पाळेमुळे खोदण्याचे काम केले जात आहे.

हे सुद्धा वाचा : आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

म्होरके केले जेरबंद

गेल्या काही महिन्यांपुर्वी सुरू झालेल्या पथकाने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक तसेच औरंगाबाद विभागांमध्ये समन्वय वापरून मोठी कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची साठवणूक, वितरण साखळी व आर्थिक व्यवहार उघडकीस आणत काही म्होरके देखील जेरबंद केले आहेत. स्थानिक पोलिसांकडून होणारी कारवाई तसेच टास्क फोर्स अशा दोन वेगवेगळ्या पातळीवर ड्रग्ज तस्करांवर कारवाई सुरू झाल्याने अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Antf team is trying to break the growing drug chain in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Drugs Case

संबंधित बातम्या

न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील
1

न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील

Uttar Pradesh : लग्न नको म्हणाली म्हणून रक्ताने आंघोळ घातली, सनकी आशिकने झाडाला किशोरवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले
2

Uttar Pradesh : लग्न नको म्हणाली म्हणून रक्ताने आंघोळ घातली, सनकी आशिकने झाडाला किशोरवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

Maharashtra 1st Conclave 2026: पुढील ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर…; EV क्रांतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
3

Maharashtra 1st Conclave 2026: पुढील ५ वर्षांत पेट्रोल-डिझेलचे दर…; EV क्रांतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

कोल्हेंचे दत्तक गाव तहानलेले, दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी; संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’चा इशारा
4

कोल्हेंचे दत्तक गाव तहानलेले, दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी; संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.