Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी आणि लगतच्या परिसरात सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरण्याऐवजी चिंतेचा ठरत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 24, 2026 | 12:30 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Follow Us
Close
Follow Us:
  • रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग
  • मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात
  • मजुरांची तीव्र टंचाई
ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी आणि लगतच्या परिसरात सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरण्याऐवजी चिंतेचा ठरत आहे. एकीकडे हवामानातील बदलांशी झुंज देत कष्टाने पिकवलेला कांदा हातात आला असताना, दुसरीकडे परप्रांतीय मजुरांच्या तुटवड्यामुळे आणि स्थानिक मजुरांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

 

दरवर्षी ओतूर ,रोहोकडी परिसरात मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशातील मजुरांच्या टोळ्या मोठ्या संख्येने दाखल व्हायच्या. हे मजूर ‘ठोक’ पद्धतीने किंवा करारानुसार कांदा काढणीची कामे वेळेत पूर्ण करायचे. मात्र, यंदा या मजुरांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक मजूर आपापल्या गावी परतले आहेत, तर काही मजूर औद्योगिक क्षेत्राकडे किंवा इतर शाश्वत कामांकडे वळले आहेत. परिणामी, ज्या शेतकऱ्यांकडे ८ ते १० एकर कांदा आहे, त्यांना काढणीसाठी महिनाभर वाट पाहावी लागत आहे.

परप्रांतीय मजूर मिळत नसल्याने स्थानिक मजुरांकडे धाव घेण्यावाचून शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही. मात्र, या संधीचा फायदा घेत स्थानिक मजुरांकडून अवाच्या सव्वा मजुरीची मागणी केली जात आहे. पूर्वीच्या तुलनेत यंदा एकरी काढणीचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. खते, औषधे आणि लागवडीचा खर्च आधीच वाढलेला असताना, आता काढणीसाठी होणारा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा ठरत आहे.

सध्या वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने शेतातील कांदा लवकरात लवकर काढून सुरक्षित स्थळी (चाळीत) हलवणे गरजेचे आहे. जर वेळेत काढणी झाली नाही, तर जमिनीतच कांदा सडण्याची भीती आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या भीतीपोटी शेतकरी मिळेल त्या दरात मजूर लावून काम उरकण्याचा प्रयत्न करत आहेत.

“कांदा पिकासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले. खते, बियाणे आणि औषधांवर मोठा खर्च झाला आहे. आता पीक तयार आहे, पण काढणीसाठी माणसं मिळेनात. वेळेवर कांदा निघाला नाही तर वर्षभराची मेहनत मातीमोल होईल.” — एक व्यथित शेतकरी

मजुरांची तीव्र टंचाई

मजुरांच्या तीव्र टंचाईमुळे अनेक ठिकाणी विचित्र पण कौतुकास्पद चित्र पाहायला मिळत आहे. मजुरांची वाट बघून थकलेले शेतकरी आता स्वतःच्या कुटुंबासह शेतात उतरले आहेत. अबालवृद्ध, महिला आणि अगदी शालेय मुलेही कांदा काढणी, पाती कापणे आणि गोणी भरण्याच्या कामात मदत करताना दिसत आहेत. ‘मजूर मिळेना, म्हणून घरचीच माणसं कामाला लागली’ अशी परिस्थिती सध्या ओतूरच्या शिवारात पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा : इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार; प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

शेतकरी सध्या दुहेरी संकटात

कांदा हा असा घटक आहे जो कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो, तर कधी उत्पादकांच्या. ओतूर-रोहोकडी पट्ट्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहेत. एकीकडे मजुरांची टंचाई आणि दुसरीकडे बाजारभावाची अनिश्चितता. जर सरकारने याकडे लक्ष दिले नाही किंवा मजुरांच्या उपलब्धतेसाठी काही यंत्रणा उभी राहिली नाही, तर कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक गर्तेत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Farmers in junnar taluka have started harvesting onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • onion

संबंधित बातम्या

नुकसान भरपाईसाठी कदमवाकवस्तीतील ग्रामस्थ संतप्त; आजपासून आमरण उपोषणाचा इशारा
1

नुकसान भरपाईसाठी कदमवाकवस्तीतील ग्रामस्थ संतप्त; आजपासून आमरण उपोषणाचा इशारा

ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
2

ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

कुलूपबंद दवाखाना अन् डॉक्टर बेपत्ता, प्रशासनाचा निष्काळजीपणा; शेतकरी, पशुपालक अडचणीत
3

कुलूपबंद दवाखाना अन् डॉक्टर बेपत्ता, प्रशासनाचा निष्काळजीपणा; शेतकरी, पशुपालक अडचणीत

आंबेगाव तालुक्यात रस्त्यालगत धोकादायक विहिरी; संरक्षक कठडे, जाळी अन् कुंपणाअभावी अपघाताचा धोका
4

आंबेगाव तालुक्यात रस्त्यालगत धोकादायक विहिरी; संरक्षक कठडे, जाळी अन् कुंपणाअभावी अपघाताचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.