शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Shubman Gill breaks Graham Gooch’s record : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात शुभमन गिलने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नवे नोदंवला आहे. शुभमन गिल भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या कामगिरीने शुभमन गिलने ग्राहम गूचचा विक्रम मोडीत काढला आहे.
गिलने भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा इंग्लंडचा महान फलंदाज ग्राहम गूचचा विक्रम मोडला आहे. या कामगिरीने गिलने इतिहास रचला आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार गूच यांनी १९९० मध्ये इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले होते. यामध्ये त्यांनी एकूण ७५२ धावा केल्या होत्या.
सध्याच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या युवा शुभमन गिलने पहिल्या चार सामन्यांमध्ये ७२२ धावा फटकावल्या होत्या. तर ओव्हलमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यामध्ये गिलला गूचचा विक्रम मोडण्यासाठी त्याला किमान ३१ धावांची गरज होती. पहिल्या डावात त्याने २१ धावा केल्या, ज्यामुळे तो गूचचा ३५ वर्षांचा जुना विक्रम मोडण्यापासून केवळ १० धावा दूर राहिला होता. पण दुसऱ्या डावात गिलने १० धावा करताच गूचचा विक्रम मोडीत काढला आहे.
गूचचा विक्रम मोडण्यापूर्वी, गिलने एक मोठी कामगिरी केली आहे. भारतासाठी कसोटी मालिकेच्या पहिल्या डावात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा सुनील गावस्करचा विक्रम शुभमन गिलने मोडला होता. गावस्करने १९७८-७९ च्या भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सहा सामने खेळून यामध्ये एकूण ७३२ धावा केल्या होत्या.
हेही वाचा : ‘कधीकधी अंतर तुम्हाला..’, फुलराणीचा चाहत्यांना सुखद धक्का; सायना नेहवाल आणि पती पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र
भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा गावस्करचा विक्रम मोडण्यासाठी गिलला आणखी २१ धावांची आवश्यकता होती. परंतु तिसऱ्या दिवशी लंचनंतर तो पहिल्याच चेंडूवर माघारी परतला आणि गावस्कर यांचा विक्रम मोडण्यास गिलला यश आले नाही. १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून खेळताना पहिल्या मालिकेत गावस्कर यांनी कॅरिबियन बेटांवर चार कसोटी सामने खेळले होते. त्याम्हद्ये त्यांनी ७७४ धावा केल्या होत्या. .