Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s ODI World Cup : राज्य सरकारकडून स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांचा गौरव होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा 

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने भारतीय महिला संघाचा अभिनंदन प्रस्ताव पारित केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 04, 2025 | 04:02 PM
Women's ODI World Cup: State government will honour Smriti, Jemimah and Radha Yadav; CM Fadnavis' big announcement

Women's ODI World Cup: State government will honour Smriti, Jemimah and Radha Yadav; CM Fadnavis' big announcement

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव
  • महाराष्ट्र राज्य करणार भारतीय संघाचा सत्कार 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

Smriti, Jemimah and Radha Yadav will be honored by the state government : रविवारी, २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत खेळवण्यात आलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघांवर ५२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने पाहिल्यांदाच विश्वचषक जेतेपद पटकावले आहे. भारतीय खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून विजतेपदाला गवसणी घातली. या कामगिरीमुळे भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य मंत्रिमंदळाकडून भारतीय महिला संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव या राज्यातील खेळाडूंचा रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल असे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हे तिन्ही खेळाडू विश्वविजेत्या संघाचा भाग होत्या.

हेही वाचा : IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत

भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिले महिला एकदिवसीय विश्वचषक जेतेपद जिंकले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारकडून भारतीय महिला संघाचे अभिनंदन करण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल सांगितले की “आज मंत्रिमंडळाने आयसीसी महिला विश्वचषकामध्ये विश्वचषक जिंकून भारतीय महिला चमूने जी देदीप्यमान कामगिरी केली आहे. त्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या महराष्ट्रातल्या तीन खेळाडू, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि राधा यादव यांच्या सत्कार राज्य सरकारच्या  वतीने करण्यात येईल. तसेच आपल्या धोरणानुसार रोख रक्कम देखील देण्यात येईल.”

राधा यादव, जेमीमा आणि स्मृति यांचा होणार सत्कार

राधा यादव, जेमीमा आणि स्मृति यांचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात येणार असला तरी त्यांना किती रोख रक्कम देण्यात येईल याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारतीय संघातील राधा यादव मूळची उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील आहे पण तिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मुंबई येथून केली आणि सध्या ती गुजरातसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते. तसेच भारताची स्टार खेळाडू  स्मृती मानधनाचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे झाला, परंतु तिचे बालपण आणि शिक्षण महाराष्ट्रातील सांगली येथे गेले. ती भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळते आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करते. समीफायनलमध्ये शतक झळकवून भारताला विजयी करणारी जेमीमा रॉड्रिग्ज ही एक भारतीय क्रिकेटपटू आहे जिचा जन्म मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. ती मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षांखालील क्रिकेट संघांसाठी खेळली आहे.

हेही वाचा : IND W vs SA W : हिमाचल सरकारकडून होणार रेणुका ठाकूरचा सन्मान! मुख्यमंत्री सुखु यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

भारताची जेतेपदावर मोहोर

रविवारी, २ नोव्हेंबर रोजी, नवी मुंबई येथे आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्माच्या अर्धशतकांच्या भारतीय संघाने ७ बाद २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, कर्णधार लॉरा वोल्वार्ड (१०१) च्या शतकानंतर देखील दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.३ षटकांत केवळ २४६ धावाच करू शकला. परिणामी भारतीय संघाने विजेतपद आपल्या नवे केले.

Web Title: Cm devendra fadnavis congratulate indian women criceket team for odi world cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis
  • ICC Women Cricket World Cup 2025
  • Jemimah Rodrigues
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 
1

IND W vs SA W Final Match : ‘१९८३ सारखा बदल घडविण्याची…’ भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मजुमदार यांचे विधान चर्चेत 

IND W vs SA W : हिमाचल सरकारकडून होणार रेणुका ठाकूरचा सन्मान! मुख्यमंत्री सुखु यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर 
2

IND W vs SA W : हिमाचल सरकारकडून होणार रेणुका ठाकूरचा सन्मान! मुख्यमंत्री सुखु यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर 

Amravati : भारतीय महिलांनी पहिल्यांदाच ICC महिला विश्वचषक जिंकला, सर्वत्र आनंद व्यक्त
3

Amravati : भारतीय महिलांनी पहिल्यांदाच ICC महिला विश्वचषक जिंकला, सर्वत्र आनंद व्यक्त

चॅम्पियन संघ…चॅम्पियन खेळाडूंनी खास अंदाजात घालवली रात्र! सोशल मिडियावर शेअर केले काही खास Photo
4

चॅम्पियन संघ…चॅम्पियन खेळाडूंनी खास अंदाजात घालवली रात्र! सोशल मिडियावर शेअर केले काही खास Photo

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.