रेणुका ठाकूर(फोटो-सोशल मीडिया)
Renuka Thakur receives Himachal government award : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु यांच्याकडून सोमवारी भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरला १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिमला जिल्ह्यातील रोहरू भागातील रहिवासी असणारी रेणुका ठाकूर ही जगज्जेते भारतीय महिला क्रिकेट संघाचा भाग होती. मुख्यमंत्र्यांनी रेणुका ठाकूर यांच्या विजयावर फोनवरून चर्चा केली असून त्यांच्याकडून पहिला विश्वचषक जिंकून इतिहास रचल्याबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा : ICC ने Women’s Cricket World Cup संघाची केली घोषणा, कर्णधार हरमनप्रीत कौरला टीममधून वगळले
काय म्हणाले मुख्यमंत्री सुखु?
मुख्यमंत्र्यांनी सुखु यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर हिमाचल प्रदेशला सन्मान मिळवून देणाऱ्या रेणुका ठाकूरचा राज्याला अभिमान आहे. त्यांनी अशी आशा देखील व्यक्त केली की इतर मुली त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी रेणुकाकडून प्रेरणा घेत राहतील. परसा गावातील रहिवासी रेणुकाच्या कुटुंबाकडून भारताच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाचा मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला. रेणुकाची आई सुनीता ठाकूर तिच्या मुलीच्या कामगिरीने खूप आनंदित झाली असून तिने स्पष्ट केले की रेणुका लहानपणी कापडाच्या चेंडूने खेळत असे.
मुलींना कधीही मागे ठेवू नका..
सुनीता ठाकूर पुढे म्हणाल्या की, देवाने सर्वांना रेणुकासारखी मुलगी द्यायला हवी. “आम्ही सर्व पालकांना सांगू इच्छितो की जर तुमच्या मुलींना प्रगती करायची असेल तर त्यांना कधीही मागे ठेवू नका. त्यांना पाठिंबा द्या आणि प्रोत्साहन द्या.” क्रिकेटपटू रेणुका ठाकूरचा भाऊ विनोद ठाकूर म्हणाला की, “मला माझ्या बहिणीचा अभिमान असून आम्ही संपूर्ण सामना पाहिला. तिची गोलंदाजी आणि विकेट घेण्याची क्षमता असाधारण होती. आम्ही तिचे फोनवरून अभिनंदन केले.”
दोन वर्षांची असताना वडील गमावल्यालेल्या रेणुकाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाप्रवास कठीण होता. वडिलांच्या निधनानंतर, तिची आई सुनीता यांनी जलशक्ती विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून अनेक वर्षे मुलांना वाढविण्यासाठी काम करत राहिली. रेणुका ठाकूर गावातील शाळेत शिकली आहे.
हेही वाचा : IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
रविवारी, २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत खेळला गेलेला अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघांवर ५२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ बाद २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, कर्णधार लॉरा वोल्वार्ड (१०१) च्या शतकानंतर देखील दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.३ षटकांत केवळ २४६ धावाच करू शकला.भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.






