Corporate League : सचिन तेंडूलकर जिमखान्यात रंगणार कॉर्पोरेट महिला लीग, २ ऑक्टोबरपासून विविध संघांचा सहभाग, सौजन्य : एआय
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) मान्यतेने खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेद्वारे महिला क्रिकेटला कॉर्पोरेट स्तरावर नेण्याचा तसेच व्यावसायिक रोजगाराचा मार्गही खुला करण्याचा आयोजकांचा प्रमुख उद्देश आहे. तसेच या लीगद्वारे महिला खेळाडूंना त्यांची कारकीर्द घडवण्यासाठी आणि सामन्यांचा मौल्यवान अनुभव मिळवण्यासाठी एक व्यावसायिक व अत्यंत स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अमर क्रिकेटर्स आमंत्रित कॉर्पोरेट महिला T-20 लीगमध्ये सर्व्हिफाय (Servify), आरआर ग्रुप (RR Group), विश्राम वेल्थ (Wishram Wealth), इम्प्रिंट डिस्प्लेस (Imprint Displays), जाझ स्क्वेअर (Jaz Square) आणि पार्श्व बुलियन (Parshwa Bullion) या सहा कॉर्पोरेट संस्थांचे संघ सहभागी होतील.
विशेष म्हणजे, या कंपन्या निवडक खेळाडूंना वार्षिक करार किंवा परस्पर करारावर आधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहेत, ज्यामुळे महिला क्रिकेटपटूंसाठी एक शाश्वत आर्थिक व्यवस्था निर्माण होईल.
याबाबत अमर क्रिकेटर्सचे अध्यक्ष आणि MCA च्या मध्यवर्ती परिषदेचे सदस्य भूषण पाटील म्हणाले की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाने ही लीग महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचे वार्षिक व्यासपीठ बनेल.
Asian Games 2026 : हमारी छोरियाँ किसी से कम नहीं; 4×400 मीटर रिले स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी
स्पर्धेत समतोल राखण्यादृष्टीने एमसीए सर्व संघांमध्ये गुणवान खेळाडूंची योग्य विभागणी करण्यास सक्रियपणे मदत करेल. तसेच, युवा खेळाडूंच्या विकासाला चालना देण्यासाठी या लीगमध्ये प्रत्येक १५ खेळाडूंच्या संघात १९ आणि २३ वर्षांखालील किमान दोन खेळाडूंचा समावेश करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
प्रत्येक संघ सहा संघ वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध प्रत्येकी चार लीग सामने खेळेल. अशा प्रकारे एकूण १२ लीग सामने होतील. गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येतील. अमर क्रिकेटर्सतर्फे स्पर्धेचा सर्व आवश्यक खर्च उचलून खेळाडूंच्या हिताला प्राधान्य देत आहे. प्रत्येक खेळाडूला संपूर्ण क्रिकेट किट/पोशाख, जेवण, अल्पोपहार आणि ५ हजार रुपयांचे निश्चित सहभाग मानधन दिले जाईल.
ICC T20 Ranking : श्री चरणीने रचला ‘हा’ नवा इतिहास, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा विक्रमही मोडला
विजेत्या संघाला एक लाख रुपये आणि चषक, उपविजेत्या संघाला एक लाख रुपये आणि चषक असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला (वुमन ऑफ द सिरीज) १५ हजार रुपये आणि चषक दिला जाईल. सर्वोत्कृष्ट फलंदाज / गोलंदाज / क्षेत्ररक्षक (प्रत्येकी १० हजार रुपये व चषक) आणि प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठीही बक्षीस ठेवण्यात आले आहे.






