
फोटो सौजन्य - RCB/CSK सोशल मीडिया
इंडियन प्रीमियर लीग 2025 मेगा ऑक्शन : इंडियन प्रीमियर लीग 2025 मेगा लिलावाचा पहिला दिवस आता पार पडला आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात मेगा लिलाव कालपासून सुरु झाला आहे. या लिलावाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला 72 खेळाडूंची विक्री झाली, त्यात 24 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. राईट टू मॅच कार्ड वापरून चार खेळाडूंना खरेदी करण्यात आले. आयपीएल मेगा लिलाव 2025 च्या पहिल्या दिवशी खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. पंजाब किंग्ज व्यतिरिक्त, सर्वांच्या नजरा चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यावर देखील आहेत. अशा स्थितीत, लिलावाच्या पहिल्या दिवसापासून चेन्नई आणि बेंगळुरूच्या संघानी कोणत्या खेळाडूंना विकत घेतले यावर एकदा नजर टाका.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 साठी पाच खेळाडूंना कायम ठेवले होते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या पर्समध्ये ५५ कोटी रुपये शिल्लक राहिले. आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी चेन्नईने 7 खेळाडूंना खरेदी केले. या 7 खेळाडूंपैकी 3 परदेशी खेळाडू, 6 कॅप्ड खेळाडू, एक अनकॅप्ड खेळाडू आणि एक खेळाडू राईट टू मॅच कार्डद्वारे खरेदी करण्यात आला. चेन्नईने पहिल्या दिवशी 39.40 कोटी रुपये खर्च केले. आता चेन्नई सुपर किंग्जकडे दुसऱ्या दिवसासाठी 15.60 कोटी रुपये शिल्लक आहेत.
नूर अहमद (विदेशी खेळाडू), रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे (विदेशी खेळाडू), सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र (विदेशी खेळाडू, आरटीएम), राहुल त्रिपाठी, विजय शंकर (अनकॅप्ड खेळाडू).
Super 7⃣ of the day! 🥳#SuperAuction #UngalAnbuden pic.twitter.com/Kwx9U62X6h — Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 24, 2024
रुतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना (विदेशी खेळाडू), शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि एमएस धोनी.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल 2025 साठी तीन खेळाडूंना कायम ठेवले होते. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पर्समध्ये 83 कोटी रुपये शिल्लक राहिले. आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी बेंगळुरूने 6 खेळाडूंना खरेदी केले. या 6 खेळाडूंपैकी 3 परदेशी खेळाडू, 4 कॅप्ड खेळाडू आणि 2 अनकॅप्ड खेळाडू खरेदी करण्यात आले. बेंगळुरूने पहिल्या दिवशी 52.35 कोटी रुपये खर्च केले. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे दुसऱ्या दिवसाचे 30.65 कोटी रुपये शिल्लक आहेत.
जोश हेझलवूड (विदेशी खेळाडू), फिल सॉल्ट (विदेशी खेळाडू), जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन (विदेशी खेळाडू), रसिक दार, सुयश शर्मा यांना खरेदी केले.
We’ve played our cards right tonight and secured a top quality batting line-up already. ♦️♣️♠️♥️ And we move to Day 2️⃣ of the auction with the highest purse of 30.65 Cr and there are a few gun players up for grabs. Trust the planning! 😇#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPLAuction… pic.twitter.com/BoxqMlDWUv — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 24, 2024
विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल या खेळाडूंना कायम ठेवले आहे