
धावांचा पाठलाग करणाऱ्या सुपर किंग्सला शेवटच्या षटकात विजयासाठी १५ धावांची गरज होती. डोनोव्हान फरेरा आणि शुभम रंजने खेळपट्टीवर होते. दासुन शनाका षटक टाकण्यासाठी आला. टेक्सासचा संघ सहज जिंकेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पहिल्या चेंडूवर चौकार मारला गेला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली गेली. आता, शेवटच्या चार चेंडूंमध्ये १० धावा शिल्लक होत्या. सुपर किंग्सचा विजय जवळपास निश्चित वाटत होता.
पण इथूनच सामन्याचे चित्र पालटले. शनाकाने आपल्या तिसऱ्याच चेंडूवर डोनोव्हान फरेराला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर फलंदाजीला आलेला कॅल्विन सॅवेज शनाकाचा विकेट ठरला. शनाकाने ५ व्या चेंडूवर अॅडम मिल्नलची विकेट घेत पहिली हॅट-ट्रिक घेतली . ही मेजर लीग क्रिकेट २०२६ मधील दुसरी हॅट-ट्रिक ठरली. आता शेवटचा चेंडू उरला होता आणि टेक्सास सुपर किंग्सचे लक्ष्य तेच १० धावांचे होते. पराभव निश्चित होता. पण त्याने शेवटच्या उरलेल्या चेंडूवर आम्सी डी सिल्वाला बाद केले आणि अशाप्रकारे सामन्याच्या शेवटच्या चार चेंडूंमध्ये चार विकेट घेतले.
Take a bow, Shanaka 🙇#SeattleOrcas #AmericasFavoriteCricketTeam #MLC2026 #SOvTSK #DasunShanaka | @dasunshanaka1 pic.twitter.com/PQlgkxagiQ — Seattle Orcas (@MLCSeattleOrcas) July 6, 2026
अशाप्रकारे, सिएटल ऑर्कासने हा सामना ९ धावांनी जिंकला. डबल हॅट-ट्रिक घेऊन संघाला विजय मिळवून देणाऱ्या शनाकाला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जेव्हा एखादा गोलंदाज तीन चेंडूंमध्ये तीन विकेट्स घेतो, तेव्हा त्याला ‘हॅट-ट्रिक’ म्हणतात. क्रिकेटच्या भाषेत, जेव्हा एखादा गोलंदाज चार चेंडूंमध्ये चार विकेट्स घेतो, तेव्हा त्याला ‘डबल हॅट-ट्रिक’ म्हणतात. या श्रीलंकन खेळाडूने अमेरिकेत सध्या खेळल्या जात असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली आहे. शनाका सिएटल ऑर्कस संघाकडून खेळतो.