DC vs GT: First they clashed directly, then threatened the umpires in the ongoing match; What did Kuldeep Yadav do? Watch the video
DC vs GT : पुन्हा सुरू झालेल्या आयपीएल २०२५ च्या ६० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने दिलेले २०० धावांचे टार्गेट गुजरातने साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या खेळाच्या जोरावर सहज पूर्ण करून दिल्लीवर १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मात्र एक प्रकार घडून आला. दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू कुलदीप यादव पंचांवर रागावलेला दिसून आला. दोघांमध्ये जोरदार वाद देखील झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
अधिक माहिती अशी की, कुलदीप यादव पंचांच्या एका निर्णयावर खूप रागावलेला दिसून आला. दोघांमध्ये बराच वेळ संवाद देखील सुरू राहिला. पण शेवटी कुलदीप निराश झाल्याचे दिसून आले. यादरम्यान कुलदीप पंचांना धमकावत असतानाही दिसला.
हेही वाचा : DC vs GT : आयपीएलचा इतिहासात पहिल्यांदाच! गुजरात टायटनच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला 10 विकेट्सने केले पराभूत
घडल असं की, जेव्हा गुजरातचा संघ धावांचा पाठलाग करत होता, तेव्हा कुलदीप यादव डावातील सातवे षटक टाकण्यासाठी आला. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनकडून लेग साईडकडे फ्लिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो शॉट नीट खेळू शकला नाही आणि चेंडू थेट त्याच्या पॅडवर आदळला. हे पाहून कुलदीप यादवने जोरदार अपील केले, परंतु पंचांनी त्याला फेटाळून लावले आणि सुदर्शन नॉट आऊट असल्याचे घोषित केले. पंचांच्या या निर्णयावर कुलदीपला खूप संताप आला. त्याने कर्णधार अक्षर पटेलला रिव्ह्यू घेण्यास पटवले. रिव्ह्यू पाहिल्यानंतर असे आढळून आले की चेंडू स्टंपच्या फक्त एकाच भागाला लागला होता, त्यामुळे तो निर्णय पंचांचा होता. मोठ्या पडद्यावर नॉट आउटचा निर्णय आल्यानंतरही कुलदीपचा रंग शांत झाला नाही.
इतकेच नाही तर, डीआरएस दरम्यान, जेव्हा कुलदीप यादव त्याच्या रन-अपवर परतत होता आणि त्याच्या सहकाऱ्यांकडे जात होता, तेव्हा तो पंचांशी वाद घालू लागला. तो स्टम्प माइकवर “काय भाऊ, कसं वाटतंय?” असे बोलताना ऐकू आला. यानंतर तो असे देखील म्हणाला, “जर पंचांचा निर्णय असता तर मी बोट वर केले असते. असं होत नाही भाऊ. अरे यार, काय पंचिंग झालं आहे.” यादरम्यान, कुलदीप हसत होता आणि मध्येच एक-दोन सौम्य शिवीगाळ देखील करताना तो दिसला.
After KL Rahul Firing now
It’s Kuldeep Yadav who is catching all eyes.. 🙄😂 pic.twitter.com/t5XdCzDES3
— Killer Cool 🇮🇳 (@KillerCool13) May 18, 2025
हेही वाचा : DC vs GT : ‘दोनो भाई दोनो तबाही’साई…सुदर्शन आणि शुभमन गिलच्या जोडीचा अरुण जेटली मैदानावर कहर
कुलदीप यादवच्या रागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सद्या तूफान व्हायरल होत आहे. त्याच्या प्रतिक्रियांचे काही फोटो देखील व्हायरल होत आहेत ज्यात तो पंचांकडे पाहताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, आता अनेकांना असे वाटते की कुलदीपने जे केले ते चुकीचे होते.
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, गुजरातने एकही विकेट न गमावता १० विकेट्सने विजय मिळवून आयपीएलमध्ये एक इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने २०० धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले आहे. गुजरातसोबतच, आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांनी देखील आयपीएल प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे.