फोटो सौजन्य - IndianPremierLeague
साई सुदर्शन – शुभमन गिल : दिल्ली विरुद्ध गुजरात यांच्यात सामना पार पडला आणि या सामन्यात दोन शतक फलंदाजांनी ठोकले. पहिल्या डावामध्ये केएल राहुलने शतक ठोकले होते तर दुसऱ्या डावामध्ये साई सुदर्शनने शतक नावावर केले. या शतकीय खेळीसह साई सुदर्शनने भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. सईने या सिझनमध्ये सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर या सीजनमध्ये तो ऑरेंज कॅपचे शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजेच आजच्या सामन्यात गुजरातचा एकही विकेट गेला नाही. फक्त गुजरातच्या दोन्ही सलामी वीर फलंदाजांनीच 20 ओव्हर फलंदाजी केली.
आजच्या सामन्यांमध्ये गुजरातच्या दोन्ही फलंदाजांनी अरुण जेटली मैदानावर कहर केला आहे. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी सामना एकतर्फी नेला आणि या सामन्यात साई सुदर्शनने शतक झळकावले आहे. या सामन्यांमध्ये साई सुदर्शनने ५६ चेंडूंमध्ये शंभर धावा केल्या. त्याने आजच्या सामन्यात दमदार फलंदाजी केली आणि त्याने सामना गुजरातच्या बाजूने एकतर्फी नेला आहे. यामध्ये त्याने तीन षटकार आणि बारा चौकार मारले. साई सुदर्शनच नाही तर या सामन्यात शुभमन गिल याने देखील कमाली जी फलंदाजी आज केली आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला.
𝙒𝙝𝙖𝙩 𝙖𝙪𝙧𝙖, 𝙬𝙝𝙖𝙩 𝙛𝙤𝙧𝙢 😎
A magnificent 1️⃣0️⃣0️⃣ from Sai Sudharsan 👏
His second in #TATAIPL 🤩
Updates ▶ https://t.co/4flJtatmxc #DCvGT | @sais_1509 pic.twitter.com/IFsV7CRxXZ
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
शुभमन गिलच्या फलंदाजी बद्दल बोलायचं झाले तर आजच्या सामन्यात त्याने 53 मध्ये 93 धावा केल्या आणि नाबाद राहिला. यामध्ये त्याने सात षटकार आणि तीन चौकार मारले त्याचबरोबर 175 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. शुभमन गिलने या सीझनमध्ये सातत्याने कमालीची फलंदाजी केली आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीवर देखील चाहत्यांची नजर असणार आहे.
ऑरेंज कॅपच्या लढती बद्दल सांगायचे झाले तर पहिल्या स्थानावर साई सुदर्शन आहे. साई सुदर्शन ने 12 सामन्यांमध्ये 617 धावा केल्या आहेत. तर यामध्ये त्याने एक शतक आणि पाच अर्धशतक ठोकले आहेत. या सीजन मध्ये साई सुदर्शन ने 156 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या स्थानावर संघाचा कर्णधार शुभमन गिलने कबता केला आहे यामध्ये त्याने 12 सामन्यात 601 धावा केल्या आहेत. यात त्यांनी सहा अर्धशतक ठोकले आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर यशस्वी जयस्वाल आहे त्याने तेरा सामन्यांमध्ये 523 धावा केल्या आहेत.