फोटो सौजन्य - IndianPremierLeague
DC vs RCB first innings report : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना सुरु आहे, या सामन्याचा पहिला डाव झाला आहे. आजच्या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाहिले फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निराशाजनक कामगिरी आणि संथ गतीने फलंदाजी केली त्यामुळे मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरले. आजचे सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत 163 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आज बंगळुरूच्या संघाकडे दिल्ली कॅपिटल्सकडून त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत करून बदल घेण्याची सुवर्णसंधी आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर अभिषेक पोरेल याने सुरुवातीचे काही चेंडू चांगले खेळले आणि मोठे शॉट मारले होते. अभिषेक पोरेल याने संघासाठी ११ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि २ चौकार मारले त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने संथ धावा केल्या आणि त्यांना त्या नक्कीच महागात पडणार आहेत. करुण नायर आणखी एकदा फेल ठरला. त्याने ४ चेंडू खेळले आणि चौकार मारून विकेट गमावली. फाफ डुप्लेसी आज संघामध्ये पुनरागमन झाले यामध्ये त्याने २६चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. केएल राहुल आज फलंदाजीला आला पण तो त्याने प्रभावीपणे आज त्याने खेळी खेळली नाही.
आजच्या सामन्यात केएल राहुलने संघासाठी ३९ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या. अक्षर पटेलने संघासाठी आज १३ चेंडूमध्ये १५ धावा केल्या. आजच्या सामन्यात ट्रिस्टन स्टब्स शेवटच्या काही ओव्हरमध्ये फलंदाजीला आला आणि त्याने चांगले शॉट दाखवले. त्याने १७ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर भुवनेश्वर कुमार याने संघासाठी ३ विकेट घेतले. भुवनेश्वर कुमार याने संघासाठी महत्वाचे विकेट घेतले. यामध्ये त्याने केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जोश हझलवूड याने संघासाठी आणखी एकदा कमालीची कामगिरी केली त्याने या सामन्यात संघासाठी २ विकेट घेतले. यामध्ये त्याने अभिषेक पोरेल आणि अक्षर पटेल याना आऊट केले. कृणाल पंड्या आणि यश दयाल यांच्या दोघांच्या होती प्रत्येकी १ विकेट लागला.