Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. क्रिकेट सामन्यावर पावसाच्या सावटाबाबत साशंका व्यक्त केली जात होती पण क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे की या मॅचदरम्यान वातावरण पूर्णपणे स्वच्छ असेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 01:50 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • दुसरा मोठा महामुकाबला, भारत विरुद्ध इंग्लंड भिडणार
  • मुंबईत होणाऱ्या या सामन्यात कसं असेल हवामान?
  • पाऊस पडला तर…
IND VS ENG Weather Report : ICC T20 वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. या सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. क्रिकेट सामन्यावर पावसाच्या सावटाबाबत साशंका व्यक्त केली जात होती पण क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे की या मॅचदरम्यान वातावरण पूर्णपणे साफ राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

SA vs NZ Pitch Report: सेमीफायनलमध्ये कोणाची चालणार जादू? बॉलर्स की बॅटर्स, कोलकाताचा पिच रिपोर्ट

मुंबईतील हवामान कसं असेल?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 मार्च रोजी मुंबईत आकाश निरभ्र राहणार आहे. आणि पावसाबाबत बोलायचं तर पावसाची शक्यता शून्य टक्के असल्याचं स्पष्ट केलं आहे. दिवसाचं कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर रात्रीचे तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आर्द्रतेचे प्रमाण 35 ते 51 टक्क्यांच्या दरम्यान असणार आहे. म्हणजेच खेळाडूंना हवामानाशी संबंधित कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. त्यामुळे सेमी फायनलचा सामना चुरशीचा आणि धडाकेबाज होणार यात काहीही शंका नाही.

स्टेडियमची खेळपट्टी

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांना अनुकूल मानली जाते. स्वच्छ हवामान असल्यामुळे दव पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. त्यामुळे दवाचा फॅक्टर वानखेडेवर नेहमीच मोठा मानला जातो. ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

पाऊस पडला तर?

सध्या पावसाची शक्यता नसली तरी, खबरदारी म्हणून ICCने राखीव दिवस राखून ठेवला आहे. जर काही कारणास्तव सामना 5 मार्च रोजी पूर्ण होऊ शकला नाही किंवा पावसाने हजेरी लावलीच तर सामना 6 मार्च, शुक्रवार रोजी राखीव दिवशी खेळवला जाईल. पण जर सेमी फायनलमध्ये आणि राखीव दिवस दोन्ही पावसामुळे वाया गेलेच तर नियमांनुसार इंग्लंड थेट अंतिम फेरीत पोहोचेल. कारण सुपर 8 टप्प्यात इंग्लंड त्यांच्या गटात पहिल्या स्थानावर राहिला होता, तर भारत दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे या नियमानुसार इंग्लंडचा पगडा जड असल्याचं दिसून येतं. पण हे नियम पावसाचा व्यत्य असेल तरच लागू होतात.

अंतिम सामन्यावर नजर

या सामन्यातील विजेता संघ 8 मार्च रोजी अंतिम फेरीत भिडेल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारत सलग तिसऱ्यांदा T20 विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडत आहे. ज्यामुळे सामन्याचा उत्साह वाढला आहे. स्वच्छ हवामानामुळे चाहत्यांच्या चिंता कमी झाल्या आहेत. सर्वांचे लक्ष आता 5 मार्च रोजी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या आणखी एका मोठ्या क्रिकेट सामन्याकडे लागले आहे.

T20 World Cup 2026 दरम्यानच ‘या’ दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

Web Title: Ind vs eng t20 world cup 2026 semi final mumbai weather report wankhede stadium imd rain prediction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • indian cricket team
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!
1

Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!

Sports Business : क्रीडा उद्योगाच्या विकासासाठी मुंबईत गुरुवारी मंथन; उद्योजक, उत्पादक येणार एकाच व्यासपीठावर
2

Sports Business : क्रीडा उद्योगाच्या विकासासाठी मुंबईत गुरुवारी मंथन; उद्योजक, उत्पादक येणार एकाच व्यासपीठावर

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक
3

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

IND vs NZ: टीम इंडियाचे न्यूझीलंडमध्ये लँडिंग, T20 सिरीजपूर्वीच चाहत्यांमध्ये क्रेझ; 3 सामन्यांचे तिकिट्स SOLD OUT
4

IND vs NZ: टीम इंडियाचे न्यूझीलंडमध्ये लँडिंग, T20 सिरीजपूर्वीच चाहत्यांमध्ये क्रेझ; 3 सामन्यांचे तिकिट्स SOLD OUT

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.