Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“वानखेडे स्टेडियममध्ये जल्लोषाची संधी देणार नाही…”, इंग्लंडच्या सॅम करनचा ‘पॅट कमिन्सच्या’ स्टाईलमध्ये भारताला इशारा

Ind vs Eng यांच्यातील ICC T20 वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्चला मुंबईत होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी, इंग्लंडचा ऑलराउंडर खेळाडू सॅम करनने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे ते सध्या चांगलंच चर्चेत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 02:16 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम करन यांचा भारताला इशारा
  • 2023 ऑस्ट्रेलियन कॅप्टन कमिन्सचं विधान चर्चेत
  • दोन वेळा सेमीफायनलमध्ये टक्कर, कोणाचा पगडा भारी?
IND VS ENG : Ind vs Eng यांच्यातील ICC T20 वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्चला मुंबईत होणार आहे. हा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी, इंग्लंडचा ऑलराउंडर खेळाडू सॅम करनने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे ते सध्या चांगलंच चर्चेत आहे.

सेमीफायनल सामन्यापूर्वी, इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करनने टीम इंडियाला एक गंभीर इशारा दिला आहे. असाच इशारा 2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने दिला होता. सॅम करनचं हे विधान पॅट कमिन्सच्या प्रसिद्ध विधानाची आठवण करून देतो.

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

सॅम करनचा भारताला इशारा

मंगळवारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत करणने विनोदी शैलीत हे विधान केलं आणि सांगितलं की, ‘गुरुवारी वानखेडे स्टेडियम शांत असेल’. वानखेडेला एक आयकॉनिक स्टेडियम म्हणत पुढे करनने सांगितलं की,
मला खात्री आहे की हा सामना शांततेत होईल. मला मोठ्या स्कोर्सचा सामना अपेक्षित आहे. आम्हाला कोणाचीही भीती वाटत नाही. दोन्ही टीम गुरुवारीच्या रात्री होणाऱ्या मॅचसाठी चांगलेच उत्साहित आहेत. जर त्या दिवशी भारतीय प्रेक्षक शांत असतील तर याचा अर्थ इंग्लंड चांगली कामगिरी करत आहे, असं विधान इंग्लंड ऑलराउंडर सॅम करन याने केलं.

2023 ऑस्ट्रेलियन कॅप्टन कमिन्सचं विधान काय?

2023 च्या अहमदाबादमध्ये भारताविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक फायनलपूर्वी, ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स म्हणाले होते की ‘वानखेडे स्टेडियमवरचे प्रेक्षक पूर्णपणे भारताच्या बाजूने असतील, पण त्यांना शांत करणं आमच्यासाठी समाधानकारक असेल’.

दोन वेळा सेमीफायनलमध्ये लढले

भारत आणि इंग्लंड गेल्या दोन वेळा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळले आहेत . 2022मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात इंग्लंड टीमने विजय मिळवला होता. 2024 मध्ये, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीतही खेळले होते. ज्यात भारतीय टीमने विजय मिळवला होता.

सेमीफायनलसाठी संघ असा असेल

भारत – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, इशान किशन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.

इंग्लंड – हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, सॅम कुरन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, ल्यूक वुड.

ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

Web Title: Sam curran warning team india and fans ahead ind vs eng semi final t20 world cup 2026 said i am sure wankhede stadium will quiet on thursday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • indian cricket team
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता
1

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…
2

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
3

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
4

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.