Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG सेमीफायनलच्या पीचवरुन हेड कोच झाले ‘गंभीर’, क्युरेटरवरुन नाराजी? नक्की काय घडला प्रकार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना गुरुवार, 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या खेळपट्टीची पहिली झलक समोर आली आहे, जी वादाचं खरं कारण ठरली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 04, 2026 | 06:05 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • टीम इंडियासाठी इंग्लंड एक मोठे आव्हान
  • गौतम गंभीर आणि क्यूरेटरमध्ये खडाजंगी?
  • इंग्लंडचे आव्हान आणि आयपीएलचा अनुभव
Gautam Gambhir lashes out: क्रिकेटमध्ये विविध गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच कोणत्याही मोठ्या सामन्यापूर्वी महत्त्वाचं काम म्हणजे तिची तपासणी. बऱ्याचवेळा सामन्याच्यापूर्वी तिची अनेकदा तपासली केली जाते.  T20 World Cup 2026चा दुसरी सेमीफायनल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सेमीफायनलचा सामना हायवोल्टेज आहे. पण त्याचबरोबर चर्चेत आहे वानखेडेची खेळपट्टी. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना गुरुवार, 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या खेळपट्टीची पहिली झलक समोर आली आहे, जी वादाचं खरं कारण ठरली.

पाकने बदलली टीम, बाबर-आयूबला दाखवला बाहेरचा रस्ता; बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये 6 नवीन खेळाडूंना एन्ट्री

इंग्लंडचा संघ भारतासाठी मोठे आव्हान

इंग्लंडचा संघ भारतासाठी एक मोठे आव्हान ठरू शकतो. वानखेडेची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल असली तरी, जर खेळपट्टीवर हिरवे गवत असेल तर वेगवान गोलंदाजांना येथे काही मदत मिळू शकते. इंग्लंडच्या संघात अनेक मजबूत खेळाडू आहेत आणि ते येथे बऱ्याच काळापासून IPLमध्ये खेळत आहेत. म्हणूनच, त्यांना परिस्थितीची चांगली जाण आहे. म्हणूनच इंग्लंडचा संघ भारतासाठी एक महत्त्वाचे आव्हान ठरू शकतो.सोशल मीडियावर वानखेडेच्या खेळपट्टीचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये खेळपट्टीवर दाट हिरवे गवत दिसत आहे. सामान्यतः वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, मात्र त्यावर गवत असल्यास वेगवान गोलंदाजांना मोठी मदत मिळते.

धोका काय?

इंग्लंडकडे जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड सारखे ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. अशा खेळपट्टीवर इंग्लंडचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतात, ही भीती व्यक्त केली जात आहे.

गौतम गंभीर आणि क्यूरेटरमध्ये खडाजंगी?

मंगळवारी भारतीय संघाने सराव सत्रात भाग घेतला. यावेळी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळपट्टीची अत्यंत बारकाईने पाहणी केली. व्हायरल फोटोंमध्ये गंभीर खेळपट्टीच्या क्यूरेटरशी चर्चा करताना प्रचंड नाराज आणि गंभीर मुद्रेत दिसत होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, गंभीरला अपेक्षित असलेली खेळपट्टी आणि प्रत्यक्ष समोर असलेली खेळपट्टी यात मोठी तफावत असल्याने त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारत या सामन्यात फिरकीपटूंच्या जोरावर इंग्लंडला रोखण्याची रणनीती आखत असावा, पण गवतामुळे ही रणनीती उलटण्याची शक्यता आहे.

🚨 COACH GAUTAM GAMBHIR IS LOOKING UNHAPPY WITH WANKHEDE STADIUM PITCH 🚨 – Indian coach is looking furious with the pitch for Semifinal match of England vs India. – Phil Salt and Jos Buttler mostly play cricket on these types of pitch. pic.twitter.com/tWoCN3Z8cJ — Anant (@ImAnant_45) March 4, 2026

इंग्लंडचे आव्हान आणि IPLचा अनुभव

इंग्लंडचा संघ भारतासाठी नेहमीच कठीण आव्हान राहिला आहे. विशेष म्हणजे इंग्लंडचे बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे त्यांना वानखेडेच्या वातावरणाची आणि बाऊन्सची चांगली जाण आहे. जर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असेल, तर इंग्लंडचा संघ अधिक घातक ठरू शकतो.

खेळपट्टी बदलणार का?

सामन्याला अजून काही तास शिल्लक असल्याने, या खेळपट्टीवरील गवत कापले जाणार की ती ‘शेव्ड’ (Shaved) केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयसीसीच्या नियमानुसार बाद फेरीच्या सामन्यांसाठी खेळपट्टीचे स्वरूप दोन्ही संघांसाठी पूरक असावे लागते, मात्र यजमान संघ नेहमीच आपल्या जमेच्या बाजू लक्षात घेऊन खेळपट्टीची मागणी करत असतो. गौतम गंभीरची ही ‘किचकिच’ टीम इंडियाला विजयापर्यंत नेणार की इंग्लंड या हिरव्या खेळपट्टीचा फायदा उठवून भारताचे विश्वचषकाचे स्वप्न भंग करणार, हे 5 मार्चलाच स्पष्ट होईल.

बाप्पा पावणार? सेमीफायनलपूर्वी Team Indiaचे खेळाडू सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा VIDEO

Web Title: Gautam gambhir lashes out at pitch curator over semi final pitch know what caused uproar inida vs england semi final t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • indian cricket team
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

पाकने बदलली टीम, बाबर-आयूबला दाखवला बाहेरचा रस्ता; बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये 6 नवीन खेळाडूंना एन्ट्री
1

पाकने बदलली टीम, बाबर-आयूबला दाखवला बाहेरचा रस्ता; बांग्लादेश विरुद्धच्या सीरीजमध्ये 6 नवीन खेळाडूंना एन्ट्री

बाप्पा पावणार? सेमीफायनलपूर्वी Team Indiaचे खेळाडू सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा VIDEO
2

बाप्पा पावणार? सेमीफायनलपूर्वी Team Indiaचे खेळाडू सिद्धीविनायकाच्या चरणी, पाहा VIDEO

काय सांगता! US-Iran तणावामुळे IND Vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनल मॅच होणार रद्द? वाचा मोठी अपडेट
3

काय सांगता! US-Iran तणावामुळे IND Vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनल मॅच होणार रद्द? वाचा मोठी अपडेट

IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा
4

IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.