
DC vs RCB, WPL 2026 Final: Friends will face each other! Jemimah and Smriti to battle for the championship; know the head-to-head information.
DDC vs RCB, WPL 2026 Final Head-to-Head Information : महिला प्रीमियर लीग २०२६ अंतिम टप्प्यात पोहचला आहे. या चालू हंगामाचा अंतिम सामना आज वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाची लढाई होणार आहे. या सामन्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे दोन्ही संघांच्या कर्णधार होत. मैदानाबाहेर चांगल्या मैत्रिणी असलेल्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना आज मात्र मैदानावर जेतेपदासाठी प्रतिस्पर्धी असणार आहेत. त्यामुळे आता आरसीबी आणि डीसी यांची हेड टू हेड स्टोरी जाणून घेऊया.
हेही वाचा : ‘वय हा माझ्यासाठी निकष…’ रोहित-कोहलीच्या 2027 च्या विश्वचषकात खेळण्याबाबत एमएस धोनीचे मोठे विधान
हेड-टू-हेड कामगिरी पहिली तर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण नऊ सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये दिल्लीने यापैकी सहा सामन्यात बाजी मारली आहे तर बेंगळुरू संघाने तीन वेळा विजय प्राप्त केला आहे. आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की, दिल्लीने हेड-टू-हेड सामन्यांमध्ये आपला दबदबा राखला आहे.
दोन्ही संघाचा फॉर्म महत्वाचा
महिला प्रीमियर लीग २०२६ या स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे दोन्ही संघाचा आत्मविश्वास दुणावला असणार. दिल्ली कॅपिटल्सने गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने देखील तीन सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
2⃣ leaders 🫡
1⃣ iconic trophy 🏆 Who will get their hands on the #TATAWPL 2026 title tomorrow? 🤩#ClaimTheCrown | #RCBvDC | #Final | @RCBTweets | @DelhiCapitals pic.twitter.com/a2YVFd7izL — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 4, 2026
महिला प्रीमियर लीगमध्ये डीसी संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आला आहे. तर देखील दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत जेतेपदाला गवसणी घालू शकलेला नाही. डीसी संघ २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु त्याला ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले होते. महिला प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामात दिल्लीने लीग टप्प्यात तिसऱ्या स्थानावर राहून एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ महिला प्रीमियर लीग २०२४ च्या हंगामात चॅम्पियन ठरला होता. त्यामुळे यावेळीही त्यांचे जेतेपद कायम राखण्याचे त्यांचे ध्येय असणार आहे. अंतिम फेरीच्या प्रवासाबाबत, बंगळुरूने लीग टप्प्यात अव्वल स्थान पटकावून थेट अंतिम फेरीत धडक मारली होती. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाची सुरुवात खूप संतुलित आहे. फलंदाजांची भूमिका स्पष्ट आहे आणि गोलंदाजी आक्रमणात देखील विविधता दिसून येते.
हेही वाचा : ICC T20I Ranking : आयसीसी टी-20 क्रमवारीत इशानची उंच उडी! पाकिस्तानी सॅम अयुब बनला नंबर-1 अष्टपैलू खेळाडू
एकूणच अंतिम सामन्यापूर्वी मोठा प्रश्न उभा राहील आहे की, दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अंतिम सामन्यांचा दुष्काळ संपवून पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरेल का? की स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सलग दुसरे विजेतेपद जिंकण्यात यशस्वी ठरेल हे पाहणे महत्वाचे असणार आहे.