
DC vs RCB, WPL 2026 Final: The final battle begins! RCB eyes its second title; wins the toss and opts to bowl.
DC vs RCB, WPL 2026 Final : महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज, ५ फेब्रुवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामान्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दिल्ली कॅपिटल्स फलंदाजी करताना दिसणार आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने २०२४ मध्ये पहिल्यांदाच ट्रॉफी जेतेपदावर नाव कोरून इतिहास रचला होता. आता या चालू हंगामात देखील हे जेतेपद कायम रखण्याकडे आरसीबीचा जोर असणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत दाखल झाला आहे. परंतु अद्यापही त्यांना पहिली ट्रॉफी मिळवता आली नाही. हा इतिहास पुसून ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने जेमिमाह रॉड्रिग्सचा संघ मैदानात उतरेल.
आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने टॉस जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, “आज आम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायला आवडेल. या स्पर्धेत हाच ट्रेंड राहिला आहे. आम्ही त्याच प्लेइंग इलेव्हनसोबत खेळत आहोत. (विश्रांतीबद्दल) हा काळ खूप छान होता. आम्हाला चांगला ब्रेक मिळाला, गेल्या २-३ दिवसांपासून आम्ही एकत्र परत आलो आणि सराव केला. आम्ही सर्वांनी आव्हानाबद्दल चर्चा केली आहे. आज आमच्यासाठी काहीही बदलणार नाही. उत्साहाची पातळी खूप जास्त आहे.”
🚨 Toss 🚨@RCBTweets have won the toss against @DelhiCapitals and elected to bowl in the #Final Predict the target #DC will set 🎯 Updates ▶️ https://t.co/9sgUo0YqOI#TATAWPL | #ClaimTheCrown | #RCBvDC pic.twitter.com/Gml8UX87a3 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 5, 2026
अंतिम सामन्यात टॉस गमावामणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाची जेमिमा रॉड्रिग्सने म्हटले आहे की. “अशा मोठ्या सामन्यांमध्ये नाणेफेक हरणेच चांगले असते. आम्ही त्याच संघासोबत खेळत आहोत. आम्ही गोष्टी खूप सोप्या ठेवल्या आहेत, आमच्या योजना सोप्या ठेवल्या आहेत. आम्ही येथे एलिमिनेटर सामना खेळलो आहोत, त्यामुळे खेळपट्टी कशी असेल याची आम्हाला कल्पना आहे.”
दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: लिझेल ली (डब्ल्यू), शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (सकर्णधार), मारिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल