Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs RCB, WPL 2026 Final Live: DC चा RCB समोर 204 धावांचा डोंगर! कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सची झुंजार खेळी 

महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत आरसीबीसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 05, 2026 | 09:31 PM
DC vs RCB, WPL 2026 Final Live: DC sets a massive target of 204 runs against RCB! A fighting innings from captain Jemimah Rodrigues.

DC vs RCB, WPL 2026 Final Live: DC sets a massive target of 204 runs against RCB! A fighting innings from captain Jemimah Rodrigues.

Follow Us
Close
Follow Us:

DC vs RCB, WPL 2026 Final : महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात  वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर सुरू आहे.  या सामान्यात टॉस गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करत  जेमिमाह रॉड्रिग्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ४  गडी गमावून २०३ धावा केल्या आहेत. आरसीबीला जेतेपद आपल्या नावे करायचे असले तर २०४ धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीकडून अरुंधती रेड्डीने १ विकेट घेतली.

हेही वाचा : अनुराग ठाकूर होणार BCCI चे नवे अध्यक्ष? मिथुन मनहासचे पद धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात 9 वर्षांची बंदी उठवली

वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या महिला प्रीमियर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात टॉस जिंकून  रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. दिल्लीची सुरुवात चांगली झाली. लिझेल ली आणि  शफाली वर्मा या सलामी जोडीने संघाला ४९  धावांची सलामी दिली. त्यानंतर शफाली वर्मा २० धावा करून बाद झाली. शफालीला अरुंधती रेड्डीने बाद केले. तिच्या नंतर लॉरा वोल्वार्ड मैदानात आली. त्यानंतर दिल्लीला लिझेल लीच्या रूपात दूसरा धक्का बसला. ली ३० चेंडूत ३७ धावा करून माघरी गेली. याखेळीत तिने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. तिला नादिन डी क्लार्कने बाद केले. दिल्लीच्या दोन विकेट्स गेल्यावर दिल्लीचा डाव लॉरा वोल्वार्ड आणि कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्स यांनी सांभाळला. या दोघींनी ७२ धावांची भागीदारी रचली.

कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला संकटातुन बाहेर काढले. त्यानंतर मात्र जेमिमाह रॉड्रिग्स ३७ चेंडूत ८ चौकरांच्या मदतीने ५७ धावांची खेळी करून माघारी गेली. तिला सायली सातघरेने आपली शिकार केली. त्यानंतर लॉरा वोल्वार्ड आणि चिनेल हेन्री यांनी सर्व मोर्चा सांभाळला. या दोघींनी अखेरच्या काही षटकात चांगलीच आक्रमकता दाखवली. या दोघींनी ५५ धावांची भागीदारी रचत संघाला २०३ पर्यंत पोहचवले. लॉरा वोल्वार्डने २५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. ती अखेरच्या चेंडूवर धाव बाद झाली. तर चिनेल हेन्री १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकरांच्या मदतीने ३५ धावा करून नाबाद राहिली. आरसीबीकडून अरुंधती रेड्डी, सायली सातघरे आणि नादिन डी क्लार्क यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Innings Break! @DelhiCapitals register the highest total in a #TATAWPL Final 🔥 Will they defend it or will #RCB chase it down? 🤔 History awaits on the other side ⏳ Scorecard ▶️ https://t.co/9sgUo0YqOI#TATAWPL | #ClaimTheCrown | #RCBvDC pic.twitter.com/3CxX6qyQE8 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 5, 2026

हेही वाचा : DC vs RCB, WPL 2026 Final : DC साठी उभी राहिली कर्णधार! जेमिमाह रॉड्रिग्सने झळकवले शानदार अर्धशतक

संभाव्य प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे

दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: लिझेल ली (डब्ल्यू), शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (सकर्णधार), मारिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल

 

Web Title: Dc vs rcb wpl 2026 final live dc sets a target of 204 runs against rcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Jemimah Rodrigues
  • RCB vs DC
  • WPL 2026

संबंधित बातम्या

 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली
1

 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

DC vs RCB, WPL 2026 Final : DC साठी उभी राहिली कर्णधार! जेमिमाह रॉड्रिग्सने झळकवले शानदार अर्धशतक 
2

DC vs RCB, WPL 2026 Final : DC साठी उभी राहिली कर्णधार! जेमिमाह रॉड्रिग्सने झळकवले शानदार अर्धशतक 

DC vs RCB, WPL 2026 Final : अंतिम रणसंग्रामाला सुरुवात! RCB चा दुसऱ्या जेतेदावर डोळा; TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 
3

DC vs RCB, WPL 2026 Final : अंतिम रणसंग्रामाला सुरुवात! RCB चा दुसऱ्या जेतेदावर डोळा; TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

DC vs RCB, WPL 2026 Final : मैत्रिणीच येणार आमनेसामने! जेमिमा आणि स्मृती यांच्यात जेतेपदासाठी लढत; जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी
4

DC vs RCB, WPL 2026 Final : मैत्रिणीच येणार आमनेसामने! जेमिमा आणि स्मृती यांच्यात जेतेपदासाठी लढत; जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.