डेक्कन ऐसेस विरुद्ध पुना क्लब मॅजिशियन्समध्ये अंतिम लढत (फोटो- सोशल मिडिया )
पहिल्या दुहेरीच्या सामन्यात सचिन बिचे व उदय पुंडे यांनी अजिंक्य मेहता व विठ्ठल ढमाले यांचा ८२-७३ असा पराभव केला. सिध्दार्थ टेंभे याने यश देशपांडे याचा ३७-३० असा पराभव करून २-० अशी आघाडी घेतली. जयदीप खांडेकर याने प्रशांत नातू याचा ९१-६१ असा पराभव करून आपल्या संघाचे खाते उघडले. ऐसेस संघाच्या अश्विन पळनीटकर याने विठ्ठल ढमाले याचा ६०-२५ असा पराभव करून संघाला ३-१ असा विजय मिळवून दिला.
Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
चुरशीच्या झालेल्या सामन्यात पुना क्लब मॅजिशियन्स् संघाने पीवायसी जिमखाना वॉरीयर्स संघाचा ३-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पुना क्लबच्या अनिश केअरिंग व अंगद सहानी यांचा आनंद आपटे व रोहीत नारगोलकर यांनी ४७-७० असा पराभव करून पीवायसीला विजयी सुरूवात करून दिली. विग्नेश संघवी याने पीवायसीच्या राजवर्धन जोशी याचा ३३-२२ असा आणि दिनेश मेहतानी याने आदित्य देशपांडे याचा १५०-८० असा पराभव करून पुना क्लबला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. निमिश कुलकर्णी याने पुना क्लबच्या सुरज राठी याचा ५९-४५ असा पराभव करून पीवायसीला २-२ अशी बरोबरी निर्माण करून दिली. निर्णायक सामन्यात पुना क्लबच्या कपिल पंजाबी याने पीवायसीच्या देवेंद्र जोशी याचा ४४-१४ असा पराभव करून संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
सामन्याचा निकाल : उपांत्य फेरी
डेक्कन जिमखाना ऐसेस वि. वि. डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स ३-१ (सचिन बिचे / उदय पुंडे वि. वि. अजिंक्य मेहता / विठ्ठल ढमाले ८२-७३; सिध्दार्थ टेंभे वि. वि. यश देशपांडे ३७-३०; प्रशांत नातू पराभूत वि. जयदीप खांडेकर ६१-९१; अश्विन पळनीटकर वि. वि. विठ्ठल ढमाले ६०-२५)
जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
पुना क्लब मॅजिशियन्स् वि. वि. पीवायसी जिमखाना वॉरीयर्स ३-२ (अनिश केअरिंग / अंगद सहानी पराभूत वि. आनंद आपटे / रोहीत नारगोलकर ४७-७०; विग्नेश संघवी वि. वि. राजवर्धन जोशी ३३-२२; दिनेश मेहतानी वि. वि. आदित्य देशपांडे १५०-८०; सुरज राठी पराभूत वि. निमिश कुलकर्णी ४५-५९; कपिल पंजाबी वि.वि. देवेंद्र जोशी ४४-१४)






