Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Snooker: पहिल्या दुहेरीच्या सामन्यात सचिन बिचे व उदय पुंडे यांनी अजिंक्य मेहता व विठ्ठल ढमाले यांचा ८२-७३ असा पराभव केला. सिध्दार्थ टेंभे याने यश देशपांडे याचा ३७-३० असा पराभव करून २-० अशी आघाडी घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 05, 2026 | 09:45 PM
‌‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌’ क्यु स्पोर्ट्‌‍स आंतरक्लब लीग २०२६

‌‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌’ क्यु स्पोर्ट्‌‍स आंतरक्लब लीग २०२६

Follow Us
Follow Us:
  • अंतिम लढत डेक्कन ऐसेस विरुद्ध पुना क्लब मॅजिशियन्स
  • ‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌’ क्यु स्पोर्ट्‌‍स
  • डेक्कन जिमखाना क्लब आयोजित आहे स्पर्धा 
पुणे/ Snooker: डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित ‌‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌’ क्यु स्पोर्ट्‌‍स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेत डेक्कन जिमखाना ऐसेस आणि पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डेक्कन जिमखाना ऐसेस संघाने आपलाच सहकारी असलेल्या डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स संघाचा ३-१ असा सहज पराभव केला.

पहिल्या दुहेरीच्या सामन्यात सचिन बिचे व उदय पुंडे यांनी अजिंक्य मेहता व विठ्ठल ढमाले यांचा ८२-७३ असा पराभव केला. सिध्दार्थ टेंभे याने यश देशपांडे याचा ३७-३० असा पराभव करून २-० अशी आघाडी घेतली. जयदीप खांडेकर याने प्रशांत नातू याचा ९१-६१ असा पराभव करून आपल्या संघाचे खाते उघडले. ऐसेस संघाच्या अश्विन पळनीटकर याने विठ्ठल ढमाले याचा ६०-२५ असा पराभव करून संघाला ३-१ असा विजय मिळवून दिला.

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

पुना क्लब-पीवायसी लढत ठरली चुरशीची

चुरशीच्या झालेल्या सामन्यात पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ संघाने पीवायसी जिमखाना वॉरीयर्स संघाचा ३-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पुना क्लबच्या अनिश केअरिंग व अंगद सहानी यांचा आनंद आपटे व रोहीत नारगोलकर यांनी ४७-७० असा पराभव करून पीवायसीला विजयी सुरूवात करून दिली. विग्नेश संघवी याने पीवायसीच्या राजवर्धन जोशी याचा ३३-२२ असा आणि दिनेश मेहतानी याने आदित्य देशपांडे याचा १५०-८० असा पराभव करून पुना क्लबला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. निमिश कुलकर्णी याने पुना क्लबच्या सुरज राठी याचा ५९-४५ असा पराभव करून पीवायसीला २-२ अशी बरोबरी निर्माण करून दिली. निर्णायक सामन्यात पुना क्लबच्या कपिल पंजाबी याने पीवायसीच्या देवेंद्र जोशी याचा ४४-१४ असा पराभव करून संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

सामन्याचा निकाल : उपांत्य फेरी 
डेक्कन जिमखाना ऐसेस वि. वि. डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स ३-१ (सचिन बिचे / उदय पुंडे वि. वि. अजिंक्य मेहता / विठ्ठल ढमाले ८२-७३; सिध्दार्थ टेंभे वि. वि. यश देशपांडे ३७-३०; प्रशांत नातू पराभूत वि. जयदीप खांडेकर ६१-९१; अश्विन पळनीटकर वि. वि. विठ्ठल ढमाले ६०-२५)

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ वि. वि. पीवायसी जिमखाना वॉरीयर्स ३-२ (अनिश केअरिंग / अंगद सहानी पराभूत वि. आनंद आपटे / रोहीत नारगोलकर ४७-७०; विग्नेश संघवी वि. वि. राजवर्धन जोशी ३३-२२; दिनेश मेहतानी वि. वि. आदित्य देशपांडे १५०-८०; सुरज राठी पराभूत वि. निमिश कुलकर्णी ४५-५९; कपिल पंजाबी वि.वि. देवेंद्र जोशी ४४-१४)

Web Title: Deccan gymkhana snooker cue sports inter club league 2026 deccan aces vs poona club magicians final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
1

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
2

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
3

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
4

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.