Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Mahavitran: वीजचोरीच्या घटनांमध्ये पुणे आघाडीवर; तीन दिवसांत ७३ प्रकरणे उघड, महावितरणची विशेष मोहीम

Pune Mahavitran: वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 22, 2026 | 02:35 AM
अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरणची विशेष मोहीम

अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरणची विशेष मोहीम

Follow Us
Follow Us:
  • तीन दिवसांत पुणे विभागात वीजचोरीची सर्वाधिक ७३ प्रकरणे उघड
  • अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरणची विशेष मोहीम
  • महसुलाची गळती रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी
Pune Mahavitran: राज्यभरात वीजचोरी आणि अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरणने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेत अवघ्या तीन दिवसांत वीजचोरीची २५० प्रकरणे उघडकीस आली असून, तब्बल सहा कोटी २७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राज्यातील चार प्रादेशिक विभागांत ही कारवाई केली.

वीजचोरीमुळे होणारी महसुलाची गळती रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. यामध्ये कोकण प्रादेशिक विभागात ५३, पुणे विभागात ७३, छत्रपती संभाजीनगर विभागात ५६, तर नागपूर विभागात ६८ वीजचोरीची प्रकरणे आढळली. या सर्व प्रकरणांचे मूल्यांकन करून संबंधित ग्राहकांना सहा कोटी २७ लाख रुपयांची देयके देण्यात आली आहेत.

Pune MSEB: वीजबिल भरायला पुणेकरांची टाळाटाळ? तब्बल ‘इतक्या’ कोटींची थकबाकी

या कारवाईत २४० ग्राहकांविरुद्ध विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये, तर अनधिकृत वीज वापराच्या दोन प्रकरणांत कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरीचे देयक आणि दंडाची रक्कम निर्धारित मुदतीत न भरणाऱ्या ग्राहकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी केले आहे.

पुणे विभागात सर्वाधिक वीजचोरी 

महावितरणच्या तीन दिवसीय विशेष मोहिमेत पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक ७३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. त्याखालोखाल नागपूर विभागात ६८, छत्रपती संभाजीनगर विभागात ५६, तर कोकण विभागात ५३ प्रकरणे आढळली.

Washim: महावितरणची अभय योजना; वीजबिल थकबाकीवरील व्याज आणि दंड १०० टक्के माफ, ६१ हजार ग्राहकांना होणार लाभ

विभागनिहाय कारवाई

प्रादेशिक विभाग                 वीजचोरीची प्रकरणे
पुणे –                                       ७३
नागपूर –                                   ६८
छत्रपती संभाजीनगर –                ५६
कोकण –                                   ५३
एकूण –                                     २५०

💡

Frequently Asked Questions

  • Que: महावितरणच्या विशेष मोहिमेत तीन दिवसांत वीजचोरीची किती प्रकरणे उघडकीस आली?

    Ans: महावितरणने राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या तीन दिवसांत वीजचोरीची २५० प्रकरणे उघडकीस आणली.

  • Que: महावितरणच्या कारवाईत कोणत्या विभागात सर्वाधिक वीजचोरीची प्रकरणे आढळली?

    Ans: पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक ७३ वीजचोरीची प्रकरणे आढळली. त्यानंतर नागपूर विभागात ६८, छत्रपती संभाजीनगर विभागात ५६ आणि कोकण विभागात ५३ प्रकरणे उघडकीस आली.

Web Title: Pune mahavitran pune leads incidents of electricity theft with 73 cases reported over last three days tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Light Bill
  • mahavitaran
  • pune news

संबंधित बातम्या

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय
1

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय

Pune Weather: हुडहुडी भरणार! पुणेकरांनो दोन दिवस स्वेटर घालूनच फिरा; तापमान थेट…
2

Pune Weather: हुडहुडी भरणार! पुणेकरांनो दोन दिवस स्वेटर घालूनच फिरा; तापमान थेट…

FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित
3

FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित
4

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.