Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

IND vs NZ Shubman Gill Loses Cool Over DRS With Umpire Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान कर्णधार शुभमन गिल आणि अंपायर यांच्यात वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 02:00 PM
Shubman Gill Loses Cool Over DRS With Umpire Video

Shubman Gill Loses Cool Over DRS With Umpire Video

Follow Us
Follow Us:
  • पंचांचा निर्णय गिलला पटेना
  • DRS वरून मैदानात जोरदार चर्चा
  • नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलचा हा निर्णय भारतीय वेगवान गोलंदाजांनी योग्य ठरवला.

न्यूझीलंडचा निम्मा संघ ७० धावांवर बाद झाला. मात्र, सामन्यादरम्यान गिल अंपायरच्या एका निर्णयावर नाराज असल्याचा दिसला. नंतर, भर मैदानातच दोघांमध्येही जोरदार वाद झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Shubman Gill Loses Cool Over DRS With Umpire Video)

Rajat Patidar: 1, 2 नाही तर 13 गगनचुंबी षटकार! रजत पाटीदारचा ‘पॉवर शो’! SMAT मध्ये शतक ठोकत रचला इतिहास

शुभमन गिल आणि अंपायर यांच्यात भरमैदानात वाद

डावाच्या ३१ व्या षटकात, जसप्रीत बुमराहचा एक वेगवान चेंडू आत येऊन ग्लेन फिलिप्सच्या पॅडला लागला. यानंतर भारतीय खेळाडूंनी अपील केले. मात्र, अंपायरने त्याला नाबाद घोषित केले. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि बुमराह यांच्यात चर्चा झाली. गिलच्या मते चेंडू बॅटला लागला नव्हता. चेंडू स्टमपवरुन गेला असावा या विचाराने बुमराह गोंधळला होता. मात्र, थोड्याच वेळात गिलने डीआरएस घेतला. अंपायरने संपूर्ण घटनेची तपासणी केली. फ्रंट ऑन कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये बॅटचा एड्ज स्पष्टपणे दिसत नव्हती, परंतु चेंडू बॅटजवळ येत असताना एक स्पाइक दिसत होता.

थर्ड अंपायर पॉल रेफेल यांनी एलबीडब्ल्यूच्या निर्णयाची वेगवेगळ्या अँगलने तपासणी केली. चेंडू किंचित डिफ्लेक्शन झाल्याचे अंपायरच्या लक्षात आले आणि त्यांनी नाबादचा निर्णय कायम ठेवला. अंपायरच्या निर्णयावर गिल अजिबात खूश नव्हता. चेंडू थेट त्याच्या पॅडला लागला, असे तो म्हणाला. त्याने तात्काळ अंपायरकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांच्यात चर्चा सुरू झाली. बुमराहसुद्धा थोडा संतप्त दिसत होता. थर्ड अंपायरचा निर्णय वैध असतो आणि याच कारणामुळे गिल थोड्याच वेळात मैदानाबाहेर गेला. यामुळे टीम इंडियाने एक महत्त्वपूर्ण रिव्ह्यूसुद्धा गमावला. गिल आणि अंपायर यांच्यातील वादाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

pic.twitter.com/EPOHfsyqSh — crictalk (@crictalk7) November 19, 2026

बुमराहची घातक गोलंदाजी

बऱ्याच कालावधीनंतर मैदानात परतलेल्या बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्याने कर्णधार टॉम लॅथमला सुरुवातीलाच शून्यावर बाद केले. न्यूझीलंडचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली आला. बुमराहने डॅरिल मिचेल आणि टॉम ब्लंडेल यांनाही बाद केले. आकाशदीप आणि अंशुल कंबोज यांनीही सुरुवातीलाच प्रत्येकी एक विकेट घेऊन न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. न्यूझीलंडचा निम्मा संघ ७० धावांत बाद झाला. पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडने ८२ षटकांत ५ विकेट्स गमावून २४३ धावा केल्या.

Jay Shah: जय शाह यांना पुन्हा मोठी जबाबदारी! सलग दुसऱ्यांदा ICC चेअरमनपदी निवड

Web Title: Ind vs nz 1st test shubman gill loses cool over drs umpire controversy viral video pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Shubhman Gill
  • Test Series
  • viral video

संबंधित बातम्या

IND vs NZ 1st Test Final Score: निकोलस – फिलिप्सने सावरला डाव, पहिल्या दिवशी ५ विकेट्स गमावून न्यूझीलंडच्या २४३ धावा
1

IND vs NZ 1st Test Final Score: निकोलस – फिलिप्सने सावरला डाव, पहिल्या दिवशी ५ विकेट्स गमावून न्यूझीलंडच्या २४३ धावा

Henry Nicholls Century: हेन्री निकोल्सने आणला भारतीय गोलंदाजांच्या तोंडाला फेस; ठोकले शानदार शतक
2

Henry Nicholls Century: हेन्री निकोल्सने आणला भारतीय गोलंदाजांच्या तोंडाला फेस; ठोकले शानदार शतक

PM Modi: मनिलात पंतप्रधान मोदी पाकिस्तानी ई-रिक्षात बसले? व्हायरल दाव्यामागे बजाजच्या एका फुटेजने फिरवली चक्रे
3

PM Modi: मनिलात पंतप्रधान मोदी पाकिस्तानी ई-रिक्षात बसले? व्हायरल दाव्यामागे बजाजच्या एका फुटेजने फिरवली चक्रे

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत एकावर एक रेकॉर्ड ब्रेक! जवागल श्रीनाथला जसप्रीत बुमराहने सोडलं मागे
4

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत एकावर एक रेकॉर्ड ब्रेक! जवागल श्रीनाथला जसप्रीत बुमराहने सोडलं मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.