ध्रुव जुरेलचं पहिलं कसोटी शतक अन् 'सैनिकी' अंदाजात कडक सलामी! (Photo Credit- X)
Dhruv Jurel Century: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू ध्रुव जुरेल याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीची पार दमछाक केली. आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकून ध्रुवने यशाचा नवा इतिहास लिहिला. त्याने १९० चेंडूंमध्ये संयमी शतक पूर्ण केले. दुखापतीमुळे ऋषभ पंत पूर्णपणे बरा न झाल्यामुळेच ध्रुवला अहमदाबाद कसोटीत संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले.
भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला पहिल्या डावात अवघ्या १६२ धावांत गुंडाळल्यानंतर, केएल राहुल आणि त्यानंतर ध्रुव जुरेल यांनी दमदार फलंदाजी करत वेस्ट इंडिजला नमवले.
A moment to cherish forever! 🥳 Special scenes 📹 in Ahmedabad as Dhruv Jurel notches up a maiden Test 💯 Updates ▶️ https://t.co/MNXdZcelkD#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank | @dhruvjurel21 pic.twitter.com/8JLGOhCAkt — BCCI (@BCCI) October 3, 2025
Dhruv Jurel Century: अहमदाबादमध्ये ‘ध्रुव’ची बॅट तळपळी; कसोटी कारकिर्दीतील झळकावले पहिले शतक
२१ जानेवारी २००१ रोजी आग्रा येथे एका जाट कुटुंबात जन्मलेल्या ध्रुवचे वडील नेम सिंग फौजी हे कारगिल युद्धात सहभागी झालेले एक शूर सैनिक आहेत. वडिलांची इच्छा होती की मुलानेही त्यांच्याप्रमाणे सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी. मात्र, ध्रुवची आवड क्रिकेटमध्ये होती.
ध्रुवने वडिलांना न सांगता आर्मी स्कूलमधील स्विमिंग क्लासेससाठी आलेल्या पैशांतून क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवले, यामुळे नेम सिंग सुरुवातीला खूप रागावले होते. मात्र, मुलाची आवड पाहून ते नंतर तयार झाले. महत्त्वाचे म्हणजे, ध्रुवचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या वडिलांनी मित्रांकडून उधार घेऊन ८०० रुपयांची पहिली बॅट त्याला खरेदी करून दिली होती.
ध्रुव जुरेलच्या आयुष्यात एक वेदनादायक घटना घडली आहे. तो अवघ्या पाच वर्षांचा असताना, त्याचा डावा पाय एका बसच्या टायरखाली आला होता. या गंभीर अपघातानंतर त्याला तातडीने प्लास्टिक सर्जरी करावी लागली होती. बालपणात इतकी मोठी वेदना सहन करूनही त्याने क्रिकेटच्या मैदानात आपले मोठे नाव कमावले आहे.