
दुलीप ट्रॉफी 2026
दुलीप ट्रॉफीच्या एकाच अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा १६ वर्षे जुना विक्रम ईशान किशनने आता मोडला आहे. या सामन्यातील दोन्ही डावा मिळून त्याने ३२६ धावा केल्या.यापूर्वी २००८ च्या दिलीप ट्रॉफी फायनलमध्ये वेस्ट झोनकडून खेळताना चेतेश्वर पुजाराने एकाच सामन्यात ३०२ रन्स (पहिल्या डावात २५ आणि दुसऱ्या डावात २७७) केल्या होत्या. ईशानने ३२६ धावा करत पुजाराचा हा विक्रम मोडला आहे.
Duleep Trophy 2026: याच्यापेक्षा तर कासव बरं! 700 रन्सचा पाठलाग अन् Tilak Verma ची संथ खेळी
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशनने पहिल्या डावात अत्यंत आक्रमक आणि बलाढ्य खेळी केली होती. त्याने दुहेरी शतक ठोकले होते. त्याने त्याचा हा फॉर्म दुसऱ्या डावात देखील कायम ठेवला आहे. जरी त्याचे शतक हुकले असले तरी 80 रन्सची दमदार खेळी करत ईस्ट झोन संघाला एक चांगली आघाडी मिळवून दिली आहे. तर साऊथ झोनचा संघ अडचणीत सापडला आहे.
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनच्या संघाने आपली पकड भक्कम केली असून विजेतेपद पटकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. पहिल्या डावात मिळालेल्या प्रचंड आघाडीच्या जोरावर दुसऱ्या डावातही ईस्ट झोनने ५०० पेक्षा जास्त रन्सची आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीचा मानकर ईस्ट झोनचा संघ होण्याची शक्यता दाट आहे.
Duleep Trophy 2026: नुसते वादळ अन् प्रतिस्पर्धी चक्काचूर! Ishan Kishan ची डबल सेंचुरी अन्…
दुसऱ्या डावात कर्णधार ईशान किशनच्या फटकेबाजीसोबतच सलामीवीर शिखर मोहनने सुरेख फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. कर्णधार ईशान किशनचे ऐतिहासिक २७० रन आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर ईस्ट झोन ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे.