फोटो सौजन्य - X
जसप्रीत बुमराह – अजित आगरकर 20 जून पासून भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटची धुरा कोण सांभाळणार यावर मोठे प्रश्नचिन्ह होते. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार होता पण त्याने आता टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे त्यामुळे आता कसोटी क्रिकेटची कमान कोणाच्या हाती द्यायची यावर बीसीसीआयला मोठी चर्चा करावी लागली. आज भारतीय संघाचा नवा कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये शुभमन गिल याला भारतीय संघाचा नवा करण्यात म्हणून घोषित करण्यात आले आहे.
जसप्रीत बुमराह याला भारतीय संघाचे कर्णधार पद मिळणार असे म्हटले जात होते पण भारतीय संघाचे कर्णधार पद हे जसप्रीत बुमराहला का देण्यात आले नाही या मागचे कारण देखील आता बीसीसीआयचे सिलेक्टर अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना विचारण्यात आले की बुमराह नेतृत्वाच्या भूमिकेत का नाही. यासोबतच त्याच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह आहे असे निवडकर्ता अजित आगरकर याने स्पष्ट केले.
उत्तर देताना अजित आगरकर म्हणाले, ‘मला वाटत नाही की बुमराह सर्व ५ सामन्यांसाठी उपलब्ध असेल.’ जरी तो ३ ते ४ कसोटी सामने खेळला तरी बुमराह आमच्यासाठी एक महत्त्वाचा खेळाडू असेल. तो या संघाचा भाग आहे याचा मला आनंद आहे. यावरून हे स्पष्ट होते की बुमराह त्याच्या फिटनेसमुळे कर्णधारपदाच्या शर्यतीत मागे पडला.
Managing workload for our match-winner! Here’s what #AjitAgarkar had to say about #JaspritBumrah. 💪
Catch all the expert reactions LIVE on FOLLOW THE BLUES. WATCH NOW – https://t.co/NRFPxrOgb1#ENGvIND pic.twitter.com/f6eydiyajP
— Star Sports (@StarSportsIndia) May 24, 2025
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची कसोटी मालिका बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळली. जिथे जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधार होता. रोहित शर्मा खेळला नसताना बुमराहने पहिल्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले. ज्यामध्ये टीम इंडियाने एक सामना जिंकला आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. खराब तंदुरुस्तीमुळे बुमराह शेवटचा संपूर्ण कसोटी सामना खेळू शकला नाही. या कारणास्तव, आता जसप्रीत बुमराहची नेतृत्व भूमिकेसाठी निवड झालेली नाही. टीम इंडिया आता त्याला फक्त एक खेळाडू म्हणून खेळवू इच्छिते.