Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eng W vs Aus W Final: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमनेसामने; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?

Eng W vs Aus W Womens T 20 World Cup 2026 final: महिला टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता हे दोन्ही संघ ५ जुलै रोजी लॉर्ड्सवर भिडतील.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 03, 2026 | 04:06 PM
Eng W vs Aus W Final: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमनेसामने; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?
Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमनेसामने
  • कधी आणि कुठे रंगणार महामुकाबला?
  • विजेतेपद कोणाला मिळणार?
महिला टी-२० विश्वचषक २०२६ ( Women’s t20 world cup 2026) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या स्पर्धेला आता दोन अंतिम स्पर्धक मिळाले आहेत. पहिल्या सेमिफायनल सामन्यात, सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला आठ विकेट्सने दुव्वा उडवला. तर दुसऱ्या सेमिफायनल सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला ४० धावांनी पराभूत करून अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. आता हे दोन्ही संघ ५ जुलै (रविवार) रोजी लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर एकमेकांसमोर आमनेसामने येतील. ऑस्ट्रेलिया विक्रमी सातव्या महिला टी-२० विश्वचषक विजेतेपदासाठी मैदानात उतरेल, तर इंग्लंड २००९ नंतर दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचे ध्येय ठेवेल.

Cristiano Ronaldo Retirement: ’हा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप?’ बहिणीच्या दाव्याने खळबळ; निवृत्तीवर CR7चे मोठे वक्तव्य

पहिल्या सेमिफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने केला वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव

स्पर्धेच्या पहिल्या सेमिफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार हेली मॅथ्यूजच्या ३० धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने सावध सुरुवात केली, पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले. जॉर्जिया वेअरहॅम, सोफी मोलिन्यू आणि ॲशले गार्डनर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत वेस्ट इंडिजला २० षटकांत १२५ धावांवर रोखले.

१२६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले, पण अनुभवी सलामीवीर बेथ मूनीने एक बाजू सांभाळून धरली. तिने ३६ चेंडूंमध्ये ६१ धावांची नाबाद शानदार खेळी करत केवळ दोन विकेट्स गमावून संघाला अवघ्या १३ षटकांत विजय मिळवून दिला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले असून आता त्यांचे लक्ष विक्रमी सातव्या विजेतेपदावर आहे.

दुसऱ्या सेमिफायनलमध्ये इंग्लंडने केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव

दुसऱ्या सेमिफायनल सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमान संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी ३५ धावांत तीन विकेट्स गमावले. त्यानंतर कर्णधार नॅट सिवर-ब्रंट आणि अनुभवी फलंदाज हेदर नाईट यांनी डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १३३ धावांची शानदार भागीदारी केली, जी महिला टी२० विश्वचषकाच्या बाद फेरीच्या इतिहासातील चौथ्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. नॅट सिवर-ब्रंट आणि हेदर नाईट या दोघींनी अर्धशतके झळकावली, ज्यामुळे इंग्लंडने आपल्या २० षटकांत पाच विकेट्स गमावून १६९ धावांची भक्कम धावसंख्या उभारली.

१७० धावांचे लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकेच्या नियमित अंतराने विकेट पडत राहिल्या. ताजमिन ब्रिट्सने अर्धशतक झळकावून झुंज दिली, पण तिला दुसऱ्या टोकाकडून महत्त्वपूर्ण साथ मिळाली नाही. संघ आपल्या २० षटकांत आठ विकेट्स गमावून केवळ १२९ धावाच करू शकला. इंग्लंडकडून लॉरेन बेल आणि चार्ली डीन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन संघाला ४० धावांनी शानदार विजय मिळवून दिला.

लॉर्ड्सवर रंगणार अंतिम सामना

महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानात रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया हा गेल्या दशकापासून या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे, तर इंग्लंड १७ वर्षांनंतर घरच्या मैदानावर ही ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल.

विजेतेपद कोणाला मिळणार?

एका बाजूला सहा वेळा विश्वविजेता ठरलेला ऑस्ट्रेलिया आहे, जो आपले वर्चस्व कायम ठेवून सातवी ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान इंग्लंड आहे, जो मायदेशात १७ वर्षांची प्रतीक्षा संपवून आपला दुसरा टी२० विश्वचषक जिंकण्याचे ध्येय बाळगून आहे. दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता, अंतिम सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे आणि क्रिकेट चाहत्यांना एका हाय-व्होल्टेज महिला क्रिकेट सामना पाहायला मिळणार आहे.

Cristiano Ronaldo: रोनाल्डोचा नॉकआउट गोल! विश्वचषकात रचला इतिहास; क्रोएशियावर 2-1 ने मात करत पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

Web Title: Eng w vs aus w womens t20 world cup 2026 final match on lords 5th july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Eng vs aus
  • Final
  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup

संबंधित बातम्या

Women World Cup Semifinal: इंग्लंडने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये South Africa ला चारली धूळ, 5 जुलैला ऑस्ट्रेलियाला देणार टक्कर
1

Women World Cup Semifinal: इंग्लंडने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये South Africa ला चारली धूळ, 5 जुलैला ऑस्ट्रेलियाला देणार टक्कर

AUS W vs WI W: ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी धुव्वा, सातव्या किताबापासून फक्त एक पाऊल दूर
2

AUS W vs WI W: ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये दणदणीत एन्ट्री; वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनी धुव्वा, सातव्या किताबापासून फक्त एक पाऊल दूर

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?
3

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर
4

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.