
IND vs NZ 4t ODI
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथा सामना आज १३ नोव्हेंबर रोजी खेळला गेला. हा सामना माऊंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर पार पडला. या महत्वाच्या सामन्यात फक्त भारतीय संघात बदल झाले नाही, तर संघाचा कर्णधारही बदलला. शुभमन गिलच्या जागी श्रेयस अय्यरला संघाची कमान सोपवण्यात आली. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून किंवींना प्रथम फलंदाजींचे आव्हान दिले. न्यूझीलंडने या निर्णयाचा मान राखत तुफानी फलंदाजी केली. न्यूझीलंडने ५० षटकांत ३३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाची फलंदाजी कोसळली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अवघ्या २६.४ षटकांत ८९ धावा करुन सर्वबाद झाला. न्यूझीलंडने भारताचा २४४ धावांनी धुव्वा उडवला. मॅट हेन्रीने भेदक गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतले.
दोन्ही संघांची प्लेइंग ११
भारत: रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार आणि अर्शदीप सिंग
न्यूझीलंड: टिम सेफर्ट (विकेटकीपर), विल यंग, निक केली, डीन फॉक्सक्रॉफ्ट, फिन ऍलन, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन, मॅट हेन्री, मॅथ्यू फिशर.