फोटो सौजन्य - सोशल मिडिया
मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने कै. दत्ताराम गायकवाड फाउंडेशन पुरस्कृत व ओम साई ईश्वर सेवा मंडळ लालबाग आयोजित पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा ८ ते ११ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेली असून सदर स्पर्धेचं उद्घाटन माननीय खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. हि स्पर्धा मनोरंजन मैदान पेरू कंपाउंड लालबाग येथे सुरु आहे. उद्घाटनीय सामन्यात महिला गटामध्ये शिवनेरी सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबवर १२-८ (मध्यंतर ६-२) असा चार गुणांनी विजय मिळवला.
शिवनेरी सेवा मंडळच्या आयुशी गुप्ताने (४ मिः २ मि. संरक्षण व ३ गुण) अष्टपैलू खेळ केला, त्यांच्याच मुस्कान शेखने (दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी २.३० मि. संरक्षण) सुंदर साथ दिली, वैभव स्पोर्ट्स क्लबच्या अवंतिका अंबोकरने (२.३०, २ मि. संरक्षण व १ गुण) व सलोनी सावंत (२.३०, १.३० मि. संरक्षण व २ गुण) सुंदर खेळी करत त्यांना उत्तम लढत दिली मात्र त्या आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.
महिला गटाच्या दुसऱ्या लढतीत सरस्वती कन्या संघाने श्री समर्थ राम मंदिर दादरवर ७-६ असे एक डाव एक गुणाने एकतफी लढत जिंकली. मध्यंतराला ७-३ अशी तब्बल चार गुणांची आघाडी सरस्वती कन्या संघाकडे होती सरस्वती कन्या संघाकडून जानबी लोंढेने ४, ६.३० मि. अशी एकतफी संरक्षणाची खेळी करत श्री समर्थ च्या आक्रमणाच कंबरड मोडल, तिला सेजल यादवने दोन्ही डावात प्रत्येकी २.१० मि. अशी सुंदर साथ दिली.
राधिका कौडुस्कर आणि नम्रता यादव यांनी प्रत्येकी दीन खेळाडू टिपून आक्रमणाची धार मजबूत केली. पराभूत श्री समर्थ व्या. मंदिर तके लढत देताना तन्वी मोरेने ४ मि. संरक्षण केले तर आस्था महाडिकने दोन सखेळाडू टिपून तिला चांगली साथ द्यायचा प्रयत्न केला पण पराभवाने समर्थचा पिछा सोडला नाही.
सम्राट राणाने नेमबाजीत रचला इतिहास आणि असे करणारा तो पहिला भारताचा शूटर
पुरुष गटाच्या सामन्यामध्ये परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने दादरच्या वैभव स्पोर्ट्स क्लबवर १७-१३ (मध्यंतर १७-६) असा एक डाव व चार गुणांनी विजय प्राप्त केला. विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या जनार्दन सावंत (२ मि. संरक्षण), तर आक्रमणामध्ये ओमकार मिरगळने तब्बल पाच बाद करत आपलं धारदार आक्रमण प्रदर्शित केले तर वैभव स्पोर्ट्स क्लब तर्फे लहत देताना निहाल पंडितने १.१० मि. संरक्षण व ४ गुण टिपून एकतफी लढत द्यायचा प्रयत्न केला.
पुरुष गटातील आणराखी एका सामन्यात ओम समर्थ भारत व्या. मंदिरने श्री समर्थ व्या. मंदिर (च) चा १२-९ (मध्यंतर १२-४) असा एक डाब ३ गुणांनी पराभव केला. ओम समर्थ तर्फे सनी तांबेने (३.४० मि. संरक्षण व ३ गुण) व प्रशिक मोरे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी उत्तम खेळ केला तर पराभूत श्री समर्थ व संघातर्फे शिरोडकरने एक मिनिट संरक्षण करत चार खेळाडू टिपले तर सिद्रिक भगतने १.२० मि. संरक्षण करून दोन गडी टिपत चांगली लढत दिली.






