गायक रोहित राऊत त्याच्या हटके आणि स्टायलिश लुकमुळे कायमच चर्चेत असतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गोड आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने परिधान केलेला खास कुर्त्या त्याच्या आजीच्या आठवणींशी जोडला आहे. आजीच्या पातळ पासून तयार केलेला कुर्ता त्याने एका कार्यक्रमात परिधान केला जातो. हा कुर्ता रोहितची बहीण किरण राऊत हिने स्वता डिझाईन केला आहे. या कुर्त्यामध्ये रोहितचा मराठमोळा लुक दिसून येत आहे. चला तर जाणून घ्या रोहित राऊतच्या कुर्त्याची खासियत. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
आजीच्या पातळाची ऊब आणि बहिणीने डिझाईन केलेला कुर्ता! रोहीत राऊतचा Swag भारी!

रोहितने कार्यक्रमात गाणं सादर करताना आजीच्या आठवणींशी जोडणारा राखाडी रंगाचा सुंदर कुर्ता परिधान केला आहे. त्यामध्ये त्याचा लुक मराठमोळा आणि स्टायलिश दिसत आहे.

राखाडी रंगांच्या कुर्त्यावर त्याने चंद्रकोर देखील लावली आहे. पारंपरिक आणि मराठमोळ्या अंदाजातील लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये रोहितने लिहिले आहे, “माझ्या आजीचं पातळ आणि त्यापासून बनवलेला हा माझा कॉस्च्यूम, खूप आठवणी व ऊब घेऊन, ???स्टेजवर आपल्या “महाराजांच” गं गेलो??? आणि त्याला तुम्ही खूप प्रेम दिलंत, त्याबद्दल खूप मनापासून आभार. माझ्यावर करीत रहा असंच प्रेम. माझा हा कॉस्च्यूम माझ्या Talented बहिणीनं बनवलाय आणि डिझाइन केलाय @kiran_b26 थँक यू सो मच. ??? गिरणी असच तुमचा प्रेम असुदेत आणि अजून छान गाणी तुमच्यापर्यंत घेऊन येईनच”.???

पारंपरिक पोशाखातील लुक चाहत्यांना आवडला असून त्याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. ‘Roar of S’ या गाण्याच्या स्टेज परफॉर्मन्स रोहितने राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

मराठमोळ्या लूकवर त्याने ग्रे रंगाची कुर्ता-पायजमावर सोनेरी बॉर्डर आणि हलकी चमक असलेली डिझाईन दिसून येत आहे. अंगरखा डिझाईनमध्ये तयार करण्यात आलेला लुक व्यक्तिमत्त्वाला उठावदारपणा देतो.






