माणगाव तालुक्यात मे महिन्यापासून मुसळधार व अवकाळी पाऊस पडत आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे बुरशीजन्य रोगांच फैलाव झाला असून भाताच्या लोंबी गळणे, दाणे काळे पडणे, कुजून कोंबे येणे, कापलेला भाताचा पेंडा कुजणे असे प्रकार झाले आहेत. शेतकऱ्याचे १००% पीक वाया गेले आहे. आमदार, खासदार, राज्यकर्ते फक्त घोषणा करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र कोणतेही मदत शेतकऱ्याला अद्याप मिळाली नाही. शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट भरीव ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. मदत न मिळाल्यास शेतकरी संघटना आक्रमक होऊन उग्र आंदोलन करेल अशा इशारा यावेळी ज्ञानदेव पोवार यांनी दिला. या मोर्चात माणगाव तालुक्यातील बहुतांशी गावातील शेतकरी बांधव सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदारांना शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.