Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: इंग्लंडच्या खेळाडूंसोबत चाललंय तरी काय? आधी फायरिंग, आता बूट चोरीला, अन्…; अमेरिकेतील ‘सुरक्षा’ धोक्यात

England’s Football Players World Cup boots & Ball stolen In FIFA: फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत एक धक्कादायक घटना घडली आहे. इंग्लंड संघाच्या खेळाडूंचे बूट आणि बॉल चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 13, 2026 | 05:44 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडच्या खेळाडूंचे बूट चोरीला
  • अमेरिकेतील सुरक्षेवर गंभीर प्रश्न
  • फिफा विश्वचषकमध्ये धक्कादायक घटना
फिफा विश्वचषक २०२६ सुरू होऊन केवळ दोन दिवस झाले आहेत. परंतु,  वादांची यादी ही वाढतच चालली आहे. अमेरिकेत होणाऱ्या विश्वचषकात, व्हिसापासून ते खेळाडूंच्या चेकिंगपर्यंतचे मुद्दे समोर आले आहेत. त्यातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेतील क्रोएशियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी इंग्लंड फुटबॉल संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड फुटबॉल संघाच्या खेळाडूंचे बूट आणि मॅच बॉल्स चोरीला गेले आहेत. यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘तू तुझे काम…’; Kane Williamson च्या निवृत्तीवर Virat Kohli भावुक; शेअर केली खास पोस्ट

इंग्लंडच्या खेळाडूंसोबत धक्कादायक प्रकार

रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड संघाने विश्वचषकापूर्वी फ्लोरिडामध्ये एक प्रॅक्टिस कॅम्प आयोजित केले होते. या काळात संघाने न्यूझीलंड, कोस्टा रिका आणि स्थानिक क्लब मियामी युनायटेड यांच्याविरुद्ध सराव सामने खेळले. प्रॅक्टिस कॅम्प संपल्यानंतर, खेळाडू शनिवारी सकाळी अमेरिकेतील कन्सास सिटी येथील टीम हॉटेलमध्ये पोहोचले. खेळाडू विमानाने पोहोचले तर त्यांचे सामान आधीच रस्ते मार्गाने पोहोचवण्यात आले होते. दरम्यान, वाटेत संघाच्या काही वस्तू चोरीला गेल्या. डेली मेलमधील वृत्तानुसार, चोरांनी खेळाडूंचे बूट, फुटबॉल आणि इतर साहित्य चोरून नेले. या घटनेमुळे इंग्लंड संघात खळबळ उडाली आहे.

England targeted by World Cup heist plot: Stars’ boots and team’s training equipment stolen in transit from Florida to Kansas training base as inquest into extent of theft begins https://t.co/LDbeB8dKRA — Daily Mail Sport (@MailSport) June 13, 2026

बूट कसे चोरीला गेले?

ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार, विश्वचषक सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाचा बेस कॅम्प फ्लोरिडामध्ये होता. संघ फ्लोरिडाहून कन्सास सिटीतील त्यांच्या बेस कॅम्पकडे, म्हणजेच स्वोप सॉकर व्हिलेजकडे, रवाना झाला. खेळाडू कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचले असले तरी, त्यांचे सामान घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला चोरांनी लक्ष्य केले. जेव्हा ते वाहन कन्सास सिटीमध्ये पोहोचले, तेव्हा सर्वांना धक्का बसला. त्या वाहनातून खेळाडूंचे खास तयार केलेले मॅच बूट, अधिकृत मॅच बॉल आणि ट्रेनिंग किट यांसारख्या अनेक अत्यावश्यक वस्तू गायब होत्या. इंग्लिश फुटबॉल असोसिएशनने (एफए) या प्रकरणी अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. इंग्लंडचा पहिला सामना १८ जून रोजी सकाळी १:३० वाजता डॅलस येथील एटी अँड टी स्टेडियमवर ग्रुप एल मधीलच क्रोएशिया संघाविरुद्ध होणार आहे.

माहितीनुसार, क्रोएशियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी खेळाडूंच्या तयारीवर परिणाम होऊ नये म्हणून कर्मचारी आता त्यांच्यासाठी नवीन बूट आणि इतर आवश्यक उपकरणांची व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत . परंतु, किती खेळाडूंचे सामान चोरीला गेले आणि नुकसानीचे प्रमाण किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

पोलिसांनी काय कारवाई केली?

या धक्कादायक घटनेनंतर, कन्सास सिटी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि काहींना अटक केली. कन्सास सिटी पोलिसांच्या सांगितले की, ‘तपास वेगाने पुढे जात असून, पुढील तपास होईपर्यंत दोन संशयितांना ताब्यात ठेवण्यात आले आहे.’ इंग्लिश फुटबॉलची नियामक संस्था, फुटबॉल असोसिएशन (FA), देखील त्या वस्तू परत मिळवण्यासाठी कॅन्ससच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत काम करत आहे.

इंग्लंडचा पहिला सामना कधी ?

ग्रुप एल मधील इंग्लंडचा पहिला सामना क्रोएशियाविरुद्ध बुधवारी, १७ जून रोजी (भारतात १८ जून रोजी) डॅलसमध्ये होणार आहे . मात्र, सामन्याच्या अगदी आधी झालेल्या या चोरीमुळे थॉमस टुशेलचा संघ एका नव्या पेचात सापडला आहे. या चोरीमुळे संघाच्या सपोर्ट स्टाफसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. तरीही, संघाच्या तयारीमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी व्यवस्थापन पर्यायी व्यवस्था आणि नवीन बूट मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच फ्लोरिडामधील इंग्लंड संघाच्या प्रशिक्षण शिबिरापासून काही अंतरावर गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामुळे सुरक्षेची चिंता वाढली आहे.

ENG W vs SL W: महिला T20 विश्वचषकाची दणदणीत सुरुवात! इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय; मोडले अनेक विक्रम

Web Title: Fifa world cup 2026 england team boots stolen kansas city security breach match balls missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • England
  • Fifa World Cup
  • Football Match
  • Football Tournament

संबंधित बातम्या

USA चा PARAGUAY वर ४-१ ने दणदणीत विजय; Fifa World Cup 2026 मध्ये बालोगुनचा धमाका
1

USA चा PARAGUAY वर ४-१ ने दणदणीत विजय; Fifa World Cup 2026 मध्ये बालोगुनचा धमाका

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?
2

New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?

FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?
3

FIFA World Cup 2026: विश्वचषकाची रंगत वाढली; मेस्सी -रोनाल्डो कधी उतरणार मैदानात? अर्जेंटिना-पोर्तुगालचा पहिला सामना कधी?

FIFA World Cup 2026 : एक ट्रॉफी, 48 दावेदार! आजपासून रंगणार FIFA चा थरार; पहिला सामना कधी अन् कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर
4

FIFA World Cup 2026 : एक ट्रॉफी, 48 दावेदार! आजपासून रंगणार FIFA चा थरार; पहिला सामना कधी अन् कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.